Uttar Pradesh: दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, अंगावर दुचाकीही घातली, उपचारादरम्यान कापावा लागला पाय
त्यानंतर कोसीकलन येथील महावीर गार्डनजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर महिलेला फेकून देऊन दोघांनी पळ काढला."
कोसी कलान (Kosi Kalan) भागातील एका 30 वर्षीय दलित महिलेवर सामूहिक बलात्काराची (Gang-Raped) घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी सामूहिक बलात्कार केला आणि नंतर त्याच्या पायावर दुचाकी चढवली. यानंतर महिलेला रेल्वे रुळावर फेकून आरोपींनी पळ काढला. उपचारादरम्यान डॉक्टरांना महिलेचा डावा पाय कापावा लागला. हे प्रकरण कोसीकलन भागातील आहे. ठाणे कोसीकलन भागातील एका गावात एक दलित महिला राहते. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, 24 मे रोजी ती बँकेतून पैसे काढण्यासाठी तिच्या गावातून कोसी कलानला जात होती, तेव्हा तिच्या गावातील एका आरोपीने तिला लिफ्ट देण्याची ऑफर दिली. वाटेत, त्याने त्याच्या दोन मित्रांना बोलावले, त्यानंतर कोसीजवळ पोहोचल्यानंतर आरोपींनी तिला पिण्यासाठी थंड पेय दिले. ते प्यायल्याबरोबर ती बेशुद्ध पडली. आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.
दुचाकी पायावर चढवली
महिलेने सांगितले की, "यानंतर आरोपींनी तिच्या पायावर बाईक चढवली. त्यानंतर कोसीकलन येथील महावीर गार्डनजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर महिलेला फेकून देऊन दोघांनी पळ काढला." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "तेथून जाणाऱ्या काही अनोळखी व्यक्तीने डीआरपीला रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या जीआरपीने महिलेला कोसी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि तिच्या कुटुंबीयांना तेथे माहिती दिली. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मथुरा येथे रेफर करण्यात आले, परंतु काही दिवस तेथे राहिल्यानंतरही काही फायदा न झाल्याने कुटुंबीय तिला आग्रा येथे घेऊन गेले.
संसर्ग झाल्याने डॉक्टरांना तिचा डावा पाय कापावा लागला
आग्रा येथे उपचार सुरू होते, परंतु तिच्या पायात संसर्ग वाढत होता. उपचाराचा खर्च जास्त असल्याने कुटुंबीयांनी तिला पलवल येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिथे पायात जास्त संसर्ग झाल्याने डॉक्टरांना तिचा डावा पाय कापावा लागला. (हे देखील वाचा: Rajasthan: 'दहा दिवसांत मंदिर सोडले नाही तर तुझा गळा कापू', भरतपूरच्या पुजाऱ्याला धमकी, म्हणाले, कन्हैयालाल सारखा हाल करु)
महिलेच्या दोन्ही आरोपींना अटक
महिलेने सांगितले - उपचारांमुळे एफआयआर लिहिण्यास उशीर झाला, कुटुंबीय तिच्या उपचारात व्यस्त होते, त्यामुळे ते पोलिसांना माहिती देऊ शकले नाहीत. एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज कुमार म्हणाले, "महिलेच्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे."