Girl Falls From Third Floor of Building In Delhi: दिल्लीतील सागरपूरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद (Watch Video)
तरुणी खाली पडताच तिच्याभोवती गर्दी जमल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Girl Falls From Third Floor of Building In Delhi: दिल्लीतील (Delhi) सागरपूर (Sagarpur) भागात एका किशोरवयीन मुलीचा घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये 17 वर्षीय तरुणी तिसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर पडताना दिसत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
तरुणी खाली पडताच तिच्याभोवती गर्दी जमल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 17 वर्षीय मुलगी तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी 7:12 वाजता त्यांना सागरपूरच्या डाबरी एक्स्टेंशन भागात बाल्कनीतून एक मुलगी पडल्याचा फोन आला. जखमी मुलीला DDU रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा -Video: फार्म हाऊसचे छत कोसळल्याने पाच मजुरांचा चिरडून मृत्यू, ही दुर्घटना इंदूर जिल्ह्यातील महू येथील चोरल गावात घडली)
प्रथमदर्शनी हे अपघाती मृत्यूचे प्रकरण असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तथापी, मृत मुलीच्या कुटुंबीयांच्या वक्तव्याचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, तिच्या आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहणारी ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून कपडे काढत असताना घसरली आणि रस्त्यावर पडली. (हेही वाचा -Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळल्याने 1 ठार; 6 जण जखमी
सागरपूरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू, पहा व्हिडिओ -
मूळ हरियाणातील रहिवासी असलेल्या कुटुंबाने सांगितले की, मृत मुलगी मानसिक आजारी होती. तिच्यावर पानिपतमध्ये उपचार सुरू होते. सध्या, कोणत्याही गुन्ह्याचा संशय नसून भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास केला जात असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.