Delhi Murder Case: दिल्लीमध्ये 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या, 2 आरोपी अटकेत
त्या हत्येप्रकरणी (Murder) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोन लोकांना अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख उमेश आणि नवीन अशी असून हे दोघेही बांधकाम साइटवर काम करणारे मजूर आहेत.
राष्ट्रीय राजधानीच्या (Delhi) उत्तम नगर (Uttam Nagar) परिसरात एका बोरीमध्ये 9 वर्षांच्या मुलाचा मृतदेह (Deadbody) सापडला होता. त्या हत्येप्रकरणी (Murder) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोन लोकांना अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख उमेश आणि नवीन अशी असून हे दोघेही बांधकाम साइटवर काम करणारे मजूर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी उत्तम नगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) एक मुलगा घरासमोर पार्कमध्ये खेळत असताना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. भादंविच्या कलम 363 अपहरण अन्वये प्रारंभी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास हाती घेण्यात आला.
त्यानंतर बेपत्ता मुलाच्या पालकांना खंडणीचा फोन आला. ज्यात अपहरणकर्त्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. क्रमांकाद्वारे बिपीन भंडारी नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. ज्याच्या नावावर मोबाईल क्रमांक नोंदणीकृत होता. जेव्हा पोलिसांच्या चमूने भंडारी यांचे घर तपासले तेव्हा त्यांना समजले की तो इतर चार मजुरांसोबत राहत होता. जे सर्व मजूर होते. त्याच मजल्यावर आणखी एक खोली होती. ज्यात दोन व्यक्ती भाडेकरू म्हणून राहत होते. हेही वाचा Uttar Pradesh Gangrape: उत्तर प्रदेशमध्ये 13 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, गावातील प्रधानाच्या मुलासह दोन जण अटकेत
या सर्वांना चौकशीसाठी पकडण्यात आले. या परिसराची अधिक तपासणी केल्यानंतर, मुलाचा मृतदेह त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत सापडला. पोलिसांच्या गुन्हे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. जिथून मृतदेह सापडला आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केली. पोलिसांनी कलम 363 आणि 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच उमेश आणि नवीन या दोघांना अटक केली आहे.
उमेश आणि नवीन यासंदर्भातील अधिक तपशील अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. प्रथमदर्शनी असे दिसते की मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्याचा मृतदेह घराच्या आत प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आला होता.