Mine Collapse in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये खान कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, अनेकजण अडकले, बचावकार्य सुरू

त्याचवेळी खाणीत आणखी 5 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mine Collapse in Chhattisgarh (PC - Twitter/ ANI)

Mine Collapse in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. जगदलपूरपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगाव गावात (Malgaon village) अचानक खाण कोसळली. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 हून अधिक गावकरी अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अजून बरेच लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचवेळी खाणीत आणखी 5 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 ते 45 मिनिटांत उर्वरित अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढले जाईल, असा अंदाज आहे. (हेही वाचा - Neelanchal Express Accident: दिल्ली-कानपूर नीलांचल एक्सप्रेस मध्ये विंडो सीट वर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत रॉड घुसून अपघाती मृत्यू)

दरम्यान, 14 नोव्हेंबर रोजी मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात एक दगडखाणी कोसळली होती. खोदकाम सुरू असताना अनेक मोठे दगड वरून तुटून पडले. यात 12 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ यांच्या पथकांनी बचाव कार्य केले. या अपघातात अडकलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला होता.