Rajya Sabha MPs To Retire In 2024: 2024 मध्ये राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार, अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांच्यासह 60 भाजप नेत्यांचा कार्यकाळ संपणार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीमुळे राज्यातील राजकीय पुनर्रचनेनंतर राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rajya Sabha MPs To Retire In 2024: पाच राज्यांतील निवडणुकांनंतर देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी जोरात सुरू आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) सह सर्वच मोठे पक्ष आपापल्या विजयासाठी रणनीती आखत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेतून (Rajya Sabha) यंदा 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. राज्यसभा सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त पदांबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. 68 रिक्त पदांपैकी, दिल्लीतील आप नेते संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा कार्यकाळ 27 जानेवारी रोजी पूर्ण होईल. सिक्कीममधील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठीही निवडणूक होणार आहे. SDF सदस्य हिशे लाचुंगपा 23 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.
एप्रिलमध्ये निवृत्त होणार 'हे' दिग्गज नेते -
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 57 नेते एप्रिलमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. (हेही वाचा -PM Narendra Modi Goes Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या 'उत्साही अनुभवाचे’ फोटो (See Photos))
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा रिक्त -
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 10 जागा रिक्त असतील, त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहार (प्रत्येकी सहा), मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल (प्रत्येकी पाच), कर्नाटक आणि गुजरात (प्रत्येकी चार), ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश (प्रत्येकी तीन), झारखंड आणि राजस्थान (प्रत्येकी दोन), आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड (प्रत्येकी एक) आणि चार नामनिर्देशित सदस्य जुलैमध्ये निवृत्त होतील.
हिमाचल आणि कर्नाटकचे गणित -
हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना त्यांच्या गृहराज्याबाहेरील जागा शोधावी लागेल. कारण तेथे काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधूनही आपले उमेदवार संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील चार आणि तेलंगणातील तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये मनमोहन सिंग आणि भूपेंद्र यादव (राजस्थान), अश्विनी वैष्णव, बीजेडी सदस्य प्रशांत नंदा आणि अमर पटनायक (ओडिशा), भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी (उत्तराखंड), मनसुख मांडविया आणि मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, काँग्रेस सदस्य नारनभाई आणि राठवा यांचा समावेश आहे. (हेही वाचा - (हेही वाचा: Traditional Dance Before PM Modi Visit: पंतप्रधान मोदींच्या केरळ भेटीपूर्वी, 2000 महिलांनी त्रिशूरमध्ये तिरुवाथिरा पारंपारिक नृत्य केले सादर, व्हिडिओ पहा)
महाराष्ट्रातील 'हे' खासदार होणार निवृत्त -
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, एमएसएमई मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस सदस्य कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या सदस्या वंदना चव्हाण आणि शिवसेना (यूबीटी) सदस्य अनिल देसाई महाराष्ट्रातून निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीमुळे राज्यातील राजकीय पुनर्रचनेनंतर राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशातील धर्मेंद्र प्रधान, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, भाजपचे सदस्य अजय प्रताप सिंग आणि कैलाश सोनी आणि काँग्रेस सदस्य राजमणी पटेल हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत. कर्नाटकात निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसचे एल हनुमंथय्या, जीसी चंद्रशेखर आणि सय्यद नासिर हुसेन यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल आणि बिहारमधून 'हे' खासदार निवृत्त होणार -
पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसचे सदस्य अबीर रंजन बिस्वास, सुभाषीष चक्रवर्ती, मोहम्मद नदीमुल हक आणि शंतनू सेन आणि काँग्रेसचे सदस्य अभिषेक मनू सिंघवी हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत. बिहारमध्ये आरजेडी सदस्य मनोज कुमार झा आणि अहमद अशफाक करीम, जेडीयू सदस्य अनिल प्रसाद हेगडे आणि बशिष्ठ नारायण सिंह, भाजप सदस्य सुशील कुमार मोदी आणि काँग्रेस सदस्य अखिलेश प्रसाद सिंह राज्यसभेत आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.
जया बच्चन यांच्यासह 'हे' नेतेही निवृत्त -
भाजपचे सदस्य अनिल अग्रवाल, अशोक बाजपेयी, अनिल जैन, कांता कर्दम, सकलदीप राजभर, जीव्हीएल नरसिंह राव, विजय पाल सिंग तोमर, सुधांशू त्रिवेदी आणि हरनाथ सिंह यादव आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सदस्य जया बच्चन निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेशमधून, टीडीपी सदस्य कनकमेडला रवींद्र कुमार, भाजप सदस्य सीएम रमेश आणि वायएसआरसीपी सदस्य प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. छत्तीसगडमधील भाजप सदस्य सरोज पांडे आणि हरियाणातील डीपी वत्स निवृत्त होत आहेत. झारखंडमध्ये भाजपचे सदस्य समीर ओराव आणि काँग्रेसचे सदस्य धीरज प्रसाद साहू हे मे महिन्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत.