IPL 2021: आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या 6 जणांना अटक, गोवा पोलिसांनी केली कारवाई

IPL (Pic Credit- IPL twitter)

आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा आज संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे. दरवर्षी आयपीएल दरम्यान अनेक लोक मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करताना पकडले जातात. आयपीएलच्या या टप्प्यातही अशा बातम्या सातत्याने बाहेर येत आहेत. महाराष्ट्रातील नागपुरातील पाच आणि राजस्थानमधील एकासह सहा जणांना शुक्रवारी बंदर शहर वास्कोमध्ये आयपीएल बेटिंग रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांकडून दोन लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन संच आणि इतर सट्टेबाजीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

गोवा पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वास्कोतील वड्डेम परिसरातील भाड्याच्या घरातून सट्टेबाजी करत असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारावर आम्ही कारवाई केली. अटक केलेल्या व्यक्तीं विरोधात सार्वजनिक जुगार कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर 2021 पासून ते या बेकायदेशीर कार्यात सामील होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिकारी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हेही वाचा Hardik Pandya Fitness Update: टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने वाढवली विराट कोहलीची चिंता, गोलंदाजी कोचने दिला मोठा उपडेट

मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी बुकींच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. काही गुन्हेगारांनी मालाडमधील लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे. तेथे बसून आयपीएल बेटिंग खेळत असल्याची टीप मुंबई गुन्हे शाखेच्या टीमला मिळाली होती. यानंतर त्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला आणि तेथून मयूर छेडा आणि जतीन शाह नावाच्या आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून 12,240 रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे, त्याशिवाय इतर नावाने घेतलेली सिमकार्डही जप्त केली आहेत. दोघेही एका वेबसाइटच्या माध्यमातून ही बेटिंग खेळत होते. या टोळीची अनेक राज्यांमध्ये पकड होती.

यापूर्वी मे महिन्यात तिघांना मुंबई पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या मुंबई टीम हॉटेलमधून अटक केली होती. जे सेंट रेजिस आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही अटक केली आहे. आयुषी केसरकर, चेतन सालेचा आणि परवेश बाफना नावाचे 3 सट्टेबाज त्याच हॉटेलमधून सट्टेबाजीचे नेटवर्क चालवत होते. जेथे राजस्थान रॉयल्स संघ मुंबईच्या लेग दरम्यान थांबला होता. हे देखील उघड झाले की बुकींनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु बायो-बबलच्या कठोर नियमांमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या प्रयत्नांमुळे एसीयूचे अधिकारी सतर्क झाले आणि एसीयूने तातडीने या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कळवले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif