Cows Thrown Into River: मध्य प्रदेशातील धक्कादाक प्रकार; 50 गायी पूर आलेल्या नदीत फेकल्या, 20 गायींचा दुर्दैवी मृत्यू
मध्य प्रदेश पोलिसांनी ४ जाणांविरोधात गुन्हा दाखल केला असून व्हिडीओची पडताळणी सुरू आहे.
Cows Thrown Into River: मध्य प्रदेशातून( Madhya Pradesh) सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सतना जिल्ह्यातील एका तुडूंब भरलेल्या नदीत अनेक काही जणांनी गायींना काठीने मारून नदीत जबरदस्तीने फेकल्याची(Cows Thrown Into River)घटना घडली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी ही व्हिडीओ पाहिल्यानंतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी झालेल्या या घटनेत 15 ते 20 गायींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा: Bihar School Closed: बिहारमध्ये गंगा आणि कोसी नदी ओव्हरफ्लो, पुरामुळे अनेक शाळा बंद)
बाम्होरजवळील रेल्वे पुलाखालून काही लोक गायींना मारहाण करत नदीत फेकून देत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी संध्याकाळी समोर आला. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांचे पथक माहिती गोळा करण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नागोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक पांडे यांनी सांगितले की, त्यांनी बेटा बागरी, रवी बागरी, रामपाल चौधरी आणि राजलू चौधरी या चौघांवर गायींच्या हत्येच्या गुन्हात एफआर दाखल केला आहे.
गायी नदीत वाहताना दिसल्या
नदीत फेकल्या गेलेल्या गायींची नेमकी संख्या अद्याप समोर आली नाही. त्याशिवाय, त्यांच्या मृत्यूची संख्या तपासानंतर कळेल, असेही पांडे यांनी म्हटले. पुढील तपास आणि आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.