Sensational Incident In Punjab: पंजाबमधील जालंधरमध्ये आर्थिक विवंचनेला कंटाळून कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या
दारौली खुर्द गावात पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे मनमोहन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा थांबवली.
Sensational Incident In Punjab: नववर्षाच्या पूर्वसंध्येला जालंधर (Jalandhar) च्या दारौली खुर्द गावात एक खळबळजनक घटना घडली. कर्जामुळे त्रस्त झालेल्या एका कुटुंबाने आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचललं. एका लहान मुलीसह कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. मनमोहन सिंग (५५), त्यांची पत्नी सरबजीत कौर (५५), दोन मुली प्रभजोत उर्फ ज्योती (३२), गुरप्रीत कौर उर्फ गोपी (३१), ज्योतीची मुलगी अमन (३) अशी मृतांची नावे आहेत.
आदमपूरचे डीएसपी विजयकंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. दारौली खुर्द गावात पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे मनमोहन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा थांबवली. (हेही वाचा -Bengaluru Shocker: सिगारेटची अॅश फेकण्यासाठी बाल्कनीत आलेल्या तरुणाचा 33व्या मजल्यावरून पडून मृत्यू, बेंगळूरूतील घटना)
मृत मनमोहन यांचे जावई सरबजीत सिंग यांनी सांगितले की, गेल्या दिवसापासून ते सासरच्या मंडळींना फोन करत होते, मात्र कोणीही फोन उचलला नाही. रविवारी सायंकाळी उशिरा ते स्वत: दारौली खुर्द येथे पोहोचले असता पाचही जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. याला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिला नसला तरी कुटुंबाने आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (हेही वाचा- क्रिकेट खेळल्यानंतर पाणी प्यायल्याने 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय
मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून कर्जामुळे त्रस्त होते, असे आजूबाजूचे लोक बोलत आहेत. आदमपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ मनजीत सिंह यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमही तपासासाठी पोहोचली आहे. मनमोहन सिंग यांनी चौघांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होईल, असे एसएसपी मुखविंदर सिंग यांनी सांगितले.