पत्नीचा त्याग करणे NRI लोकांना पडले महागात; सरकारने रद्द केले 45 पासपोर्ट
पत्नींचा त्याग केल्या कारणाने सरकारने ही कारवाई केली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.
भारत सरकारकडून 45 अनिवासी (NRI) भारतीयांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. पत्नींचा त्याग केल्या कारणाने सरकारने ही कारवाई केली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी दिली. या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार आहे. हे 45 लोक पत्नींचा त्याग करून फरारी आहेत, यांच्या विवाहाच्या तपासाचे काम राकेश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील आयएनए (इंटिग्रेटेड नोडल एजन्सी) ने पार पडले. मिळालेल्या अहवालाच्या आधारे भारत सराकडून हे पासपोर्ट रद्द केले गेले.
अनेक एनआरआय लोकांनी आपल्या पतन इच्छा त्याग केला आहे, हा एक गंभीर मुद्दा असून या विषयावर काही वर्षांपूर्वी ‘बानी’ नावाची मालिकादेखील आली होती. अनिवासी भारतीयांनी सोडून दिलेल्या पत्नींना न्याय मिळण्यासाठी सरकारने राज्यसभेत विधेयक मांडले होते, परंतु वरिष्ठ सभागृहात हे विधेयक अडवून ठेवले आहे. तसेच अनिवासी भारतीय विवाह नोंदणी कायदा, पासपोर्ट कायदा 1967 मधील दुरुस्ती आणि गुन्हेगारी प्रक्रिया 1973 मधील दुरुस्ती संदर्भात मंत्रालयाने एक अधिसूचनादेखील मांडली होती. (हेही वाचा: भारतीयांना लवकरच मिळणार Chip Based E-Passports, काय असतील या नव्या पासपोर्टची वैशिष्ट्य)
दरम्यान पंजाब आणि हरियाणा येथे अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने पत्नीला आपल्या पतीचा व्हिझा रद्द करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकारांतर्गत आतापर्यंत 13 हजार पतींचे व्हिझा रद्द करण्यात आले आहेत.