Rajasthan Rape Case: जयपूरमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने 42 वर्षीय महिलेवर केला बलात्कार, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. नुकतीच राजस्थानमधील (Rajasthan) एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. जयपूरमध्ये (Jaipur) एका 42 वर्षीय महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
देशात बलात्काराचे (Rape) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेल आहे. दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. नुकतीच राजस्थानमधील (Rajasthan) एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. जयपूरमध्ये (Jaipur) एका 42 वर्षीय महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बुधवारी महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने म्हटले आहे की, त्या व्यक्तीने तिला पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. इरफान असे आरोपीचे नाव आहे. गल्टा गेट पोलीस स्टेशन (Galta Gate Police Station) परिसरात ही घटना घडली. इरफानने तिला सांगितले की तो लॉटरीचे काम करतो. आपण लॉटरीमध्ये पैसे ठेवले तर ते दुप्पट होते. तुम्हीही पैसे गुंतवून पैसे कमवू शकता. इरफानने महिलेला फोन केला आणि बुधवारी आरएसी चौकात तिला भेटायला बोलावले. जेव्हा ती महिला पैसे घेऊन पोहचली. तेव्हा त्याने तिला सांगितले की लवकरच तुमचे पैसे दुप्पट होतील. त्यानंतर त्याने अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली. नंतर तिला बंद खोलीत नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीला महिलेने विरोध केल्यावर त्याने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने कॅमेऱ्यात हे कृत्य रेकॉर्ड केले आणि नंतर तिला ब्लॅकमेल केले. बलात्काराबद्दल कोणालाही सांगितले तर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. हेही वाचा Kerala: धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर राहिली गर्भवती; बाळाच्या जन्मानंतर भृण केला वॉशरूममध्ये फ्लश
घरी आल्यानंतर महिलेने तिच्या कुटुंबाला आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. प्रथमदर्शनी हे बलात्काराचे स्पष्ट प्रकरण असल्याचे दिसते. असे एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. महिलेचे जबाब नोंदवण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.