Theft of Tomato: OMG! झारखंडमध्ये दुकानातून 40 किलो टोमॅटोची चोरी; 66 दुकानांमधील भाजीपाला लुटला, चौकशी सुरू
टोमॅटो व इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या निषेधार्थ भाजी विक्रेत्यांनी शनिवारी आपली दुकाने बंद ठेवली.
Theft of Tomato: टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींदरम्यान, झारखंड (Jharkhand) मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजी मंडईतील दुकानातून चोरट्यांनी सुमारे 40 किलो टोमॅटो चोरून (Theft of Tomato) नेले आहेत. या घटनेनंतर भाजी विक्रेत्याने झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये तब्बल 66 दुकानांमध्ये चोरी झाल्याची तक्रार केली आहे.
भाजी विक्रेत्यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत, 66 दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 40 किलो टोमॅटो, 10 किलो आले, वजनाचे यंत्र, काही रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा - Tomato Price Hike: वाढत्या भावामुळे शेतातून झाली टोमॅटोची चोरी; शेतकऱ्याला लागला लाखोंचा चूना)
गुमल्याच्या टांगरा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ते कामानिमित्त बाजारात आले असता त्यांना चोरी झाल्याची माहिती मिळाली. टोमॅटो व इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या निषेधार्थ भाजी विक्रेत्यांनी शनिवारी आपली दुकाने बंद ठेवली.
या घटनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना, गुमटा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही भाजी विक्रेत्याने चोरीच्या लेखी तक्रारीची दखल घेतली आहे आणि दोषींना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. देशातील टोमॅटोच्या किमती अनेक कारणांमुळे वाढल्या आहेत, ज्यात भारताच्या उत्तरेकडील भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सध्या दिल्लीत टोमॅटोचे दर 250-260 रुपये किलोवर पोहोचले आहेत. आशियातील भाज्यांची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आझादपूर मंडीत टोमॅटोची 150-200 रुपयांना किरकोळ विक्री होत आहेत.