Covid-19 BF.7 Variant in India: भारतात BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्य मंत्र्याची बैठक
तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू अद्याप इतका प्राणघातक नाही. पण येणारे 3-4 आठवडे खूप महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ नक्कीच सांगत आहेत.
Covid-19 BF.7 Variant in India: कोरोना (Coronavirus) संदर्भात पुन्हा एकदा संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, देश आणि दिल्लीची स्थिती आता चांगली आहे. असे असतानाही थंडी, तापामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. डॉक्टरांच्या मते, आता ताप असलेल्या लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बहुतेक लोकांमध्ये इन्फ्लूएन्झा आढळून येत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त लोकांनी सतर्क राहून लक्षणांकडे लक्ष द्यावे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. आतापर्यंत चीनमध्ये आढळलेल्या BF.7 विषाणूचे केवळ 4 रुग्ण भारतात आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू अद्याप इतका प्राणघातक नाही. पण येणारे 3-4 आठवडे खूप महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ नक्कीच सांगत आहेत.
मेदांता रुग्णालयातील कोविड तज्ज्ञ सुशीला कटारिया यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून उच्च तापाचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह येत आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये कोविडचा प्रसार मर्यादित असल्याची माहिती मिळाली आहे. पण नवीन प्रकार आला तर त्याचा परिणाम होऊ शकतो. पुढील 4 आठवड्यांत नवीन संसर्ग किंवा स्ट्रेन आला आहे की नाही हे कळेल. यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चालू ठेवावे लागेल. (हेही वाचा -Guidelines for International Arrivals: केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केले मार्गदर्शक तत्वे; 24 डिसेंबरपासून प्रवाशांची कोविड रॅन्डम चाचणी घेण्यात येणार)
स्क्रीनिंग चालू -
रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात कोविडचा एकही रुग्ण नाही. ते म्हणाले की आता पुन्हा कोविडची चर्चा सुरू असताना आणि चीनमध्ये वाढत्या केसेस पाहता स्क्रीनिंग सुरू करण्यात आली आहे. ताप असलेल्या रुग्णांची कोविड चाचणी केली जाईल. यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. सध्या 450 खाटा आणि 50 ICU खाटा राखीव आहेत.
दिल्लीत डिसेंबरच्या 21 दिवसांत 131 नवीन कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे. बुधवारी दिल्लीत कोविडच्या 2642 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात 0.19% संसर्ग दर आढळून आला. फक्त 5 नवीन रुग्ण आढळले. 8 रुग्ण बरे झाले, मात्र एका रुग्णाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Covid-19 in China: चीनने पुन्हा लपवली कोरोना संदर्भातील माहिती; दररोज 5 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रिपोर्टमध्ये करण्यात आला दावा)
भारतात BF.7 चे 4 रुग्ण -
चीनमध्ये पसरणाऱ्या BF.7 स्ट्रेनचे 4 रुग्ण भारतातही आढळले आहेत. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान या प्रकरणांची पुष्टी झाली. ही दिलासा देणारी बाब आहे की, आत्तापर्यंत या स्ट्रेनचा संसर्ग ओमिक्रॉनच्या उर्वरित प्रकारांइतकाच देशात आढळून आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. ना हॉस्पिटलायझेशन वाढत आहे ना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे स्पष्ट होत आहे की, हा प्रकार देखील तितका धोकादायक नाही.