Odisha Shocker: धर्मांतराच्या संशयावरून 3 जणांना झाडाला बांधून जमावाची मारहाण; प्रकरणाचा तपास सुरू

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाची सुटका केली.

Photo Credit- X

Odisha Shocker: ओडिशातील बालासोर येथे जमावाने तीन तरुणांना झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या तिघांवर आदिवासी कुटुंबांचे धर्मांतर (Conversion) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. त्यानंतर जमावाने (Lynching)त्यांना बांधून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना गुरुवारी गोवर्धनपूर गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दोन गटाविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. सधया प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीसां म्हटले की, "गावात शांतता राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत." (Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती; 4 कामगारांचा मृत्यू)

यापूर्वीही असे प्रकार घडले

नुकतेच ओडिशातील बालासोर जिल्ह्यातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरठा गावात चोरीच्या संशयावरून चार तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 32 वर्षीय त्रिलोचन यांचा जागीच मृत्यू झाला, तर 35 वर्षीय सतीश सिंग, 31 वर्षीय तपुआ महंती आणि 19 वर्षीय तपन प्रधान हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरठा गावातील अजय दास नावाच्या व्यक्तीच्या कपड्यांच्या दुकानातून काल रात्री रोख रक्कम आणि कपडे चोरीला गेले. त्रिलोचन आणि त्याच्या साथीदारांवर चोरीचा संशय आल्याने अजय, त्याचे कुटुंबीय आणि इतर काही गावकऱ्यांनी चार तरुणांना ओडिशा चौकात विजेच्या खांबाला बांधले. यानंतर त्यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली.