Charred Bodies Found In Car at Karnataka: कर्नाटकात कारमध्ये सापडले 3 जळालेले मृतदेह; तिहेरी हत्येचा भयंकर कट की अपघात? वाचा

पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना एक जळालेली कार आढळून आली.

Burnt Car, Death Image (PC - Pixabay)

Charred Bodies Found In Car at Karnataka: कर्नाटकातील (Karnataka) बेंगळुरूपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या तुमकुरु (Tumakuru) शहराच्या बाहेरील तलावाच्या तळाशी एक जळालेली कार (Burnt Car) सापडली आहे. या जळालेल्या कारमधून तीन जणांचे जळालेले मृतदेह सापडल्याने प्रकरण आणखी वाढले. पोलिसांनी जळालेली कार बाहेर काढली आणि तीन अनोळखी लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

तुमकुरू येथील कुचंगी तलावाच्या तळाशी एक कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना एक जळालेली कार आढळून आली. या प्रकरणाची माहिती देताना तुमाकुरुचे पोलीस अधीक्षक (एसपी) अशोक केव्ही यांनी पीटीआयला सांगितले की, ही घटना मध्यरात्री घडली असावी. मात्र शुक्रवारी दुपारी ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. (हेही वाचा -Madhya Pradesh Shocker: 60 वर्षाच्या वृध्द महिलेवर बलात्कार, आरोपी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल; मध्य प्रदेशातील खळबळजनक घटना)

जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक केव्ही सांगितलं की, हा खुनाचा गुन्हा असल्याचा पोलिसांना संशय असून त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सापडलेल्या जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. जळालेली कार कुचंगी तलावातून बाहेर काढण्यात आली.

दरम्यान, एसपी अशोक केव्ही म्हणाले की, ही घटना कशी घडली हे त्यांना माहिती नाही? त्यांची चौकशी सुरू आहे. हे खुनाचे प्रकरण असू शकते. संशयाचे आणखी एक कारण म्हणजे दोन मृतदेह कारच्या बूट स्पेसमध्ये होते आणि तिसरा मृतदेह मागील सीटवर होता. तर समोरच्या सीटवर कोणीच नव्हते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.



संबंधित बातम्या