IndiGo Plane Bomb Threat Case: इंंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची फसवी धमकी दिल्याने 27 वर्षीय आरोपीला अटक
या धमकीमुळे विमानात एकच खळबळ उडाली आहे.
IndiGo Plane Bomb Threat Case: तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात मुंबई वरून जाणाऱ्या एका इंडिगो विमानात एक व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याची फसवी धमकी दिली. या धमकीमुळे विमानात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे. व्ही प्रसन्ना असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो थिरुवैयारू येथील रहिवासी आहे. (हेही वाचा- रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 18 जून रोजी चैन्नई- मुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. एअर लाईनच्या ग्राहक सेवा केंद्राला चॅटींगद्वारे धमकी दिली होती. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली. या व्यक्तीला नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते असे प्रसिध्द पत्रिकात म्हटले आहे.
ही धमकी फसवी असल्याचे लक्षात आल्यानंतर एअर लाइन्स व्यवस्थापकांनी पोलिसांना दिली. आरोपी बीकॉम पदवीधर आहे. आरोपीने बदला घेण्याच्या हेतूने हे कृत्य केले. गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे अनेक फसवे कॉल येत होते. पोलिसांनी या प्रकरणी कंबर कसून चौकशी सुरु केली आहे.