COVID19: दिल्लीतील 25 BSF जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
त्यामुळे आतापर्यंत दिल्लीत 42 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकारच्या आदेशाखाली कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्यावर असणाऱ्या दिल्लीतील जामा मशिद आणि चांदनी महाल भागात तैनात करण्यात आलेल्या बीएसएफ जवानांच्या 126 व्या बटालियनमध्ये ही नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
COVID19: दिल्लीतील 25 BSF जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीत 42 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकारच्या आदेशाखाली कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्यावर असणाऱ्या दिल्लीतील जामा मशिद आणि चांदनी महाल भागात तैनात करण्यात आलेल्या बीएसएफ जवानांच्या 126 व्या बटालियनमध्ये ही नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
सीमा सुरक्षा रक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्ली येथे तैनात असलेल्या या तुकडीतील एकूण 25 सैनिकांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय शनिवारी या युनिटमधील 6 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (हेही वाचा - Coronavirus: राज्यात आतापर्यंत 51 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण)
गेल्या 24 तासांत भारतात 2487 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 83 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात आतापर्यंत 40 हजार 263 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 1306 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.