Operation Ajay: ऑपरेशन अजयच्या दुसऱ्या फ्लाइटमध्ये 235 लोक मायभूमीत पोहोचले; आतापर्यंत 447 भारतीयांची इस्रायलमधून सुटका
दुसऱ्या विमानातून परतलेल्या लोकांचे स्वागत करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांना इस्रायलमधून परत आणल्याबद्दल भारतीय नागरिकांनी भारत सरकारचे आभार मानले.
Operation Ajay: ऑपरेशन अजयचे दुसरे विमान शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचले. या विमानात 235 भारतीय नागरिक मायभूमीत परतले आहेत. त्यांना इस्रायलमधून (Israel) सुखरूप परत आणण्यात आले आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 447 भारतीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांनी इस्रायलहून परतलेल्या नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले. दुसऱ्या विमानातून परतलेल्या लोकांचे स्वागत करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांना इस्रायलमधून परत आणल्याबद्दल भारतीय नागरिकांनी भारत सरकारचे आभार मानले.
ऑपरेशन अजय अंतर्गत दुसऱ्या फ्लाइटने शुक्रवारी रात्री 11.02 वाजता स्थानिक वेळेनुसार (इस्रायल) उड्डाण केले. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. इस्रायलमध्ये सुमारे 18,000 भारतीय नागरिक राहतात. (हेही वाचा - Israel-Palestine War: लेबनीज सीमेवर इस्त्राईल हल्ल्यात एक पत्रकार ठार, 2 जण जखमी)
तत्पूर्वी, इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या परतीच्या सोयीसाठी, पहिले चार्टर विमान गुरुवारी संध्याकाळी उशिरा बेन गुरियन विमानतळावरून भारतासाठी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी ते भारताची राजधानी दिल्लीला पोहोचले. पहिल्या विमानात 212 भारतीय नागरिक होते.