Wayanad Landslide Update: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; बचावकार्यासाठी लष्कराचे 225 जवान तैनात, 45 जणांचा मृत्यू, 70 जखमी

या घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमी झाले आहेत.

Photo Credit- X

Wayanad Landslide: केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन(Wayanad Landslide) झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी लष्कराचे 225 जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  (हेही वाचा:Jharkhand Train Derails: अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची व्यवस्था; बसेसही उपलब्ध (Watch Video) )

मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजता दुसऱ्यांदा भूस्खलनाची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 हून अधिक लोक अडकले. तर भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या 16 जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (हेही वाचा: Jharkhand Train Derailment: हावडा- सीएसएमटी रेल्वे रुळावरून घसरली, 6 प्रवासी जखमी (See Photo))

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या दुर्घटनेवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

पोस्ट पहा

वायनाडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे 4 गावात भूस्खलन झालं. मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. या दुर्घटनेत 45 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. चार गावात मिळून ४०० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मदतीचं काम सुरू आहे.