IPL Auction 2025 Live

Farmers Protest: शेतकरी आंदोलनात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हरियाणा सीमेवर अनेक जण जखमी

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या काही दिवसांपासून हजारो शेतकरी हरियाणा येथे आंदोलन करत आहे.

haryana Famers Protest PC Twitter

Farmers Protest:  शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या काही दिवसांपासून हजारो शेतकरी हरियाणा येथे  आंदोलन करत आहे. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ सरकराविरोधात मोर्चा करत आहे. दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांनी सीमा पार करण्यापासून अडवले आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये हातापायी होताना दिसत आहे. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे.( हेही वाचा- दिल्ली सीमेवर शेतकरी आक्रमक, सुरक्षा दल मोठ्या संख्येने तैनात)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हिंसक कारवाईत एका 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाला. खनौरी सीमेवर 22 वर्षीय शुभकरन सिंग याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे शेतकरी-पोलिसांच्या हिंसक चकमकीमुळे त्याचा मृत्यू झाला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या तसेच रबरी गोळ्या झाडल्या. या आंदोलनात 58 शेतकऱ्यांचासह 12 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. या कारावाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळत नसल्याने, कर्ज माफी व्हावी अश्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या करिता शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आवाज उठवत मोर्चा सुरु केला आहे. देशभरातील शेतकरी चलो दिल्ली असा नारा लावत आंदोलन केले आहे.आता पर्यंत या आंदोलनात सात शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे शेतकरी बांधव हिंसक रुप घेत आहे. या संदर्भात आता पर्यत केंद्रसरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ४ वेळा बैठका झाल्या आहेत.