Nirbhaya Rapists Hanging: पुढील आदेशांपर्यंत निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती; दिल्ली न्यायालयाचा आदेश
परंतु, पुढील आदेशांपर्यंत निर्भया प्रकणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे, असा आदेश दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) दिला आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या ( Delhi gang-rape case 2012) प्रकरणातील दषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. परंतु, पुढील आदेशांपर्यंत निर्भया प्रकणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे, असा आदेश दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) दिला आहे. दिल्ली न्यायालयाच्या आदेशाने देशातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित करुन घेतले आहे. यापूर्वी 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र त्यानंतर दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी फाशीची देण्यात येणार होती. यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले होते. मात्र, पुढील आदेशांपर्यत निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. कनिष्ठ कोर्टाने 9 महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. हे देखील वाचा-Nirbhaya Gangrape Case: आरोपींची फाशी अटळ, सुप्रीम कोर्टाने पवन गुप्ता याची पुर्नविचार याचिका फेटाळली
एएनआयचे ट्वीट-
दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चौघांपैकी अक्षय कुमार याने केलेली सुधारित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी ही त्याची विनंतीही न्यायालयाने अमान्य केली होती.