डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगर पालिकेचा निर्णय ; 20 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

21 Nov, 05:24 (IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. ट्विट-

 

 

21 Nov, 05:24 (IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. ट्विट-

 

 

21 Nov, 04:33 (IST)

तामिळनाडू येथे आज 1 हजार 868 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

21 Nov, 03:24 (IST)

औरंगाबाद जिल्ह्यात आज 128 जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 40368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 96 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42180  झाली आहे. ट्विट-

 

21 Nov, 02:56 (IST)

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सट्टेबाजीसह ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याचा अध्यादेश काढला आहे. ट्वीट-

 

21 Nov, 02:28 (IST)

जागतिक बालदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आणि महापालिकेच्या इमारतीला रोषणाई करण्यात आली.

21 Nov, 02:22 (IST)

WHO कडून औषधांच्या यादीमधून Remdesivir वगळण्यात आल्याचे Reuters यांनी म्हटले आहे.

21 Nov, 02:13 (IST)

मुंबई-दिल्लीसाठी रेल्वे रद्द होणार नसल्याचे मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

21 Nov, 02:00 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 1031 रुग्ण आढळले असून 13 जणांचा बळी गेला आहे.

21 Nov, 01:37 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5640 रुग्ण आढळले असून 155 जणांचा बळी गेला आहे.

21 Nov, 01:30 (IST)

पंडित दीनदयाल पेट्रोलिअम युनिव्हर्सिटी मध्ये Convocation साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या  संबोधित करणार आहेत.

21 Nov, 01:12 (IST)

दिल्ली: कोरोनाचे क्वारंटाइन नियम, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क न घालणे आणि पान,गुटखा सार्वजनिक ठिकाणी खाल्यास 2000 रुपयांचा दंड स्विकारला जाणार आहे.

21 Nov, 24:58 (IST)

गुजरात मधील राजकोट, सुरत आणि वडोदरा येथे 21 नोव्हेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू होणार आहे.

21 Nov, 24:49 (IST)

राजस्थान गृहमंत्रालयाकडून वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे कलम 144 लागू  करण्यात आला आहे.

21 Nov, 24:30 (IST)

कुर्ला येथे छठ पूजेसाठी भाविकांची तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.

21 Nov, 24:20 (IST)

भाजप सरकारच्या काळात झालेल्या State Power Firm  तुटीची चौकशी करण्याचे  महाराष्ट्र सरकारचे आदेश उर्जामंत्री  नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

21 Nov, 24:09 (IST)

हरियाणा येथे जवळजवळ 172 विद्यार्थी आणि त्याच संख्येने विविध शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा पुढील 15  दिवस बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

20 Nov, 23:47 (IST)

तमिळनाडू येथील चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.06 कोटी रुपयांचे प्रवाशाकडून सोने जप्त करण्यात आले आहे.

20 Nov, 23:28 (IST)

झारखंड येथे भाविकांकडून छठ पूजेसाठी प्रार्थना करण्यात आली.

20 Nov, 23:09 (IST)

पंढरपूरात श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

Read more


महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 तर शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. 1 डिसेंबर रोजी राज्य विधानपरिषदेच्या मतदारसंघांमधील द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडेल.

जम्मू-काश्मीर मधील नगरोटा येथील बन टोल प्लाझाजवळ काल झालेल्या चकमकीनंतर कात्रातील वैष्णोदेवी तीर्थस्थानाजवळ सुरक्षा कडक करण्यात आली होती. यात चार दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत.

राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहेच. पण त्याचबरोबर इतर अनेकही प्रश्न आहेत. वाढीव वीज बिलावरुन सध्या राजकारण रंगत आहे. वाढीव वीज बिलात सवलत दिली जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज बिलात सवलत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री विशेष बैठक घेऊन याबाबत पुर्नविचार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोविड-19 संकटामुळे ग्रासल्याने सर्वांचे लक्ष लसीच्या विकासाकडे लागले आहे. परंतु, लस भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now