Uttarakhand: चारधाम यात्रेत यावर्षी 183 भाविकांचा मृत्यू; उत्तराखंड सरकारकडून आकडेवारी जाहीर

राज्य आपत्कालीन प्रशासनाकडून बुधवारी आकडेवारी जारी झाली.

Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand)या वर्षी मे महिन्यात चारधाम यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 183 भाविकांचा मृत्यू(Pilgrims Death) झाला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिलेल्यामाहितीनुसार, या 183 मृत्यूंपैकी 177 लोकांचा मृत्यू आरोग्याच्या कारणांमुळे झाला तर इतर सहा जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला. या वर्षी 10 मे रोजी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडून चारधाम यात्रा सुरू झाली. 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले.(हेही वाचा:Char Dham Yatra 2024 Death Toll: चार धाम यात्रेदरम्यान आतापर्यंत 64 यात्रेकरूंचा मृत्यू, हायपोथर्मिया आणि हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांनी गमावला जीव )

चारधाम यात्रा संपायला अजून तीन महिन्यांहून अधिक कालावधी बाकी असताना आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक भाविक चार धाममध्ये दर्शनासाठी आले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्ता खराब झाल्याने ३१ जुलैपासून केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. पायी होणारी केदारनाथ यात्रा ऑगस्टमध्ये जवळपास पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, हेलिकॉप्टरमधून भाविक तेथे दाखल होत आहेत.

जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 15 जूनपासून उत्तराखंडमधील 13 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे 86 घरांचे पूर्ण नुकसान झाले, 242 घरे बाधीत झाली आहेत. 1,229 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.