Bihar Shocker: 18 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण, तरुणाचा मृत्यू

स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी मृताच्या खिशातून एटीएम कार्ड आणि वेगवेगळ्या व्यक्तींचे पासबुक जप्त केले आहे.

Beating | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बिहारच्या (Bihar) सुपौल (Supaul) जिल्ह्यात एका 18 वर्षीय मुलाला कथितपणे मारहाण (Beating) करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. किशनपूरजवळील ईस्टर्न कोसी तटबंदीवरील दुर्गा मंदिराजवळ सोमवारी पोलिसांना मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो गोरवगड गावचा रहिवासी होता. स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी मृताच्या खिशातून एटीएम कार्ड आणि वेगवेगळ्या व्यक्तींचे पासबुक जप्त केले आहे. हेही वाचा Jharkhand Rape Case: फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात, लग्नाचे अमिष देत तरुणीवर बलात्कार

पोलिस अधीक्षक (एसपी) शैशव यादव यांनी अधिका-यांना दोषींना लवकर पकडण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. 'पोलिस घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत,' असे एसएचओ म्हणाले.