Telangana Shocker: 17 वर्षाच्या मुलाने 13 वर्षाच्या बहिणीवर केला बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आले सत्य

सायबराबाद आयुक्तालयातील बच्चुपल्ली येथे ही घटना घडली.

Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Telangana Shocker: माणुसकी आणि नातेसंबंधांना लाजवेल असे एक नवीन प्रकरण हैदराबादमधून (Hyderabad) समोर आले आहे. 17 वर्षाच्या मुलाने 13 वर्षाच्या बहिणीवर गेल्या दोन वर्षांत अनेकदा बलात्कार (Rape) केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. सायबराबाद आयुक्तालयातील बच्चुपल्ली येथे ही घटना घडली.

बच्चुपल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक के नरसिम्हा रेड्डी म्हणाले, “मुलाला अटक करण्यात आली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे." न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा मुलगा इंटरमिजिएटच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे तर मुलगी नववीच्या वर्गात शिकत आहे. त्यांचे पालक शहरातील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पीडितेला आपल्या भावाची भीती वाटत असे म्हणून तिने यासंदर्भात आईवडिलांना काहीही सांगितले नाही. (हेही वाचा - Pune: बायकोला शरीरसंबंधासाठी मित्रांच्या हवाली करुन पती पाहात राहिला, 48 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन पुण्यात गुन्हा दाखल)

मुलीने तिच्या आईला गेल्या काही महिन्यांपासून मासिक पाळी येत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीला गचीबोवली येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती गर्भवती असल्याचे आढळून आले. यानंतर मुलीने आईला सांगितले की, तिचा भाऊ तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करतो.

आईने तिला सिकंदराबादमधील दुसऱ्या खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी नेले. परंतु डॉक्टरांनी तिला चाइल्डलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. चाइल्डलाइनच्या माध्यमातून मुलीला शहरातील भरोसा केंद्रात हलवण्यात आले असून समुपदेशनानंतर मुलीला तिच्या पालकांसह बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.