Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; उपचारादरम्यान आला हृदयविकाराचा झटका

त्यांनी सांगितले की, निपाह विषाणूच्या संसर्गाचे निदान झाल्याच्या एका दिवसानंतर रविवारी मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी, राज्याच्या आरोग्य विभागाने पुष्टी केली की, मलप्पुरम जिल्ह्यातील एका किशोरवयीन मुलाची निपाह व्हायरसची चाचणी सकारात्मक आली.

Nipah Virus, Death Image (PC - Pixabay/File Photo)

Kerala: केरळ (Kerala) मधील मलप्पुरम (Malappuram) मध्ये निपाह विषाणू (Nipah Virus) मुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. पीडित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्याला हृदयविकाराच्या झटका (Heart Attack) आला. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी अल्पवयीन मुलाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, निपाह विषाणूच्या संसर्गाचे निदान झाल्याच्या एका दिवसानंतर रविवारी मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी, राज्याच्या आरोग्य विभागाने पुष्टी केली की, मलप्पुरम जिल्ह्यातील एका किशोरवयीन मुलाची निपाह व्हायरसची चाचणी सकारात्मक आली.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.50 वाजता मुलाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला वाचवता आले नाही. जॉर्ज यांनी सांगितले की, 'पीडित मुलगा व्हेंटिलेटरवर होता. आज सकाळी त्यांचे लघवीचे प्रमाण कमी झाले होते. हृदयविकाराच्या झटक्यापासून त्याला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि सकाळी 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाचे अंतिम संस्कार वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार केले जातील. मुलाचे वडील आणि काका कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या 3 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा -Nipah Virus Outbreak in Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट अद्याप कायम; मलप्पुरममध्ये 14 वर्षांच्या मुलाची चाचणी सकारात्मक)

केरळच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, निपाह व्हायरससाठी पॉझिटिव्ह चाचणी केलेल्या चार लोकांना 'उच्च जोखीम श्रेणी' मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर मांजेरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या मलप्पुरम जिल्ह्यातील पंडिक्कड हे केरळमधील निपाह विषाणूचे केंद्र आहे. एका सल्ल्यानुसार, जॉर्ज यांनी व्हायरसने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात आणि आसपासच्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास आणि रुग्णालयात रुग्णांना भेटणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. अर्धवट खाल्लेली किंवा पक्षी किंवा प्राण्यांनी खाल्लेली फळे खाऊ नयेत, असं आवाहनही डॉक्टरांनी नागरिकांना केलं आहे. (हेही वाचा - Nipah Virus In Kerala: केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण, देशातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली 5 वर; अलर्ट जारी)

दरम्यान, राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले होते की, निपाहचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कृती दिनदर्शिका तयार केली जात आहे. 2018, 2021 आणि 2023 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात आणि 2019 मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यात निपाहचा उद्रेक झाला होता.  (हेही वाचा - Nipah Virus Outbreak: केरळमधून पश्चिम बंगालला परतलेल्या व्यक्तीत आढळली निपाह व्हायरसची लक्षणे)

निपाह व्हायरस म्हणजे काय?

निपाह विषाणू (NiV) हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा आजार आहे. त्याला झुनोटिक रोग म्हणतात. वटवाघुळ आणि डुकरांपासून तो मानवांमध्ये पसरू शकतो. या विषाणूमुळे ताप, उलट्या, श्वसनाचे आजार आणि मेंदूला सूज येऊ शकते. (हेही वाचा - Nipah Virus Outbreak: केरळात निपाह व्हायरसचा कहर; शैक्षणिक संस्था 24 सप्टेंबरपर्यंत बंद)

काय आहे निपाह व्हायरसची लक्षणे?

विषाणूजन्य तापाची सामान्य लक्षणे निर्माण करण्याव्यतिरिक्त, हा संसर्ग मज्जासंस्थेवर देखील परिणाम करतो. त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे रुग्ण 24 ते 48 तासांत कोमात जाऊ शकतो.