जयपुरात झिका व्हायरसने गाठली शंभरी!
तर बुधावारी झिका व्हायरचा आकडा शंभरवर जाऊन पोहचला आहे.
जयपुरात सध्या झिका व्हायरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर बुधावारी झिका व्हायरचा आकडा शंभरवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे या राज्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच या व्हायरसची वाढती संख्या कमी करण्यासाठी आयसीएमआरचे एक विशेष पथक जयपूरला पाठवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 100 जणांमधील 23 गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. तर झिका, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार हे मच्छरांमुळे होतात. झिका या व्हायरची लागण झालेल्या काही विद्यार्थ्यांनासुद्धा रुग्णालयातील वेगळ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. तर जयपुरमधील शास्री नगर या भागात झिका व्हायरची जास्त लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या आजाराची लागण जास्त लोकांना होऊ नये म्हणून डॉक्टर आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
झिकाची लक्षणे कशी ओळखावी?
झिकाची लागण झालेल्या व्यक्तीची शारीराची हाडे दुखणे, डोळे लाल होणे, उल्टी होणे आणि अवस्थ वाटणे ही लक्षणे दिसून येतात. तर या व्हायरमुळे जास्त त्रास झाल्यास रुग्णाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागते.
झिका पासून कसे संरक्षण करावे?
- घरामध्ये मच्छरदाणीचा उपयोग करावा.
- प्रवासावरुन किंवा बाहेरुन आल्यावर स्वच्छ हातपाय धुवावेत .
-घराच्या खिडक्या आणि दरवाज्यावर जाळी लावावी.
-तापाची लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ते उपचार घ्यावेत.