New Governor List: महाराष्ट्रासह 13 राज्यांना मिळाले नवे राज्यपाल; 'येथे' वाचा नवीन राज्यपालांच्या नावांची संपूर्ण लिस्ट
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीनामा दिला असून, त्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra New Governor) बनवण्यात आले आहे. त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
New Governor List: आज अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून अनेकांमध्ये फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीनामा दिला असून, त्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra New Governor) बनवण्यात आले आहे. त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुणाचल, झारखंड आणि हिमाचलचे राज्यपाल बदलले -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी आणि शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा - Maharashtra New Governor: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून Ramesh Bais यांची नियुक्ती)
बिहार आणि नागालँडमध्येही नवीन राज्यपाल -
राष्ट्रपती मुर्मू यांनी मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.
गुलाबचंद कटारिया झाले आसामचे राज्यपाल -
राजस्थानचे माजी गृहमंत्री आणि सध्याच्या राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कटारिया हे राजस्थानमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये ओळखले जातात.
नवीन राज्यपालांची यादी -
- रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
- लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
- लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
- सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
- शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
- गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
- निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
- बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
- अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
- एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
- फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
- राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
- ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख
दरम्यान, केंद्र सरकारने न्यायमूर्ती (निवृत्त) एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2023 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

