Uttar Pradesh News: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना

उत्तर प्रदेशातील सिध्दार्थ नगर जिल्ह्यातील बरगडवा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Dog | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सिध्दार्थ नगर जिल्ह्यातील बरगडवा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावात 10 वर्षाच्या  मुलीला सात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.  कुत्र्यांच्या भीषण हल्लेत मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तरन्नुम  असं कुत्र्याच्या हल्लेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.( हेही वाचा- आता कुत्रा चावल्यावर सरकारला द्यावी लागणार भरपाई; )

मिळालेल्या माहितीनुसार, तरन्नुम ही तिच्या मित्रासोबत शेळ्या घेऊन शेताच्या दिशेने जात होती. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. हा हल्लेत मुलगी गंभीर जखमी झाली. शरिरावर अनेक गंभीर झाल्या. तिच्यासोबत असलेले इतर मुलं घटनास्थळावरून फरार झाले आणि ही घटना गावात सांगितली. घटनास्थळी पोहचे पर्यंत मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती. तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात जाताना मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुलीला डॉक्टरांनी तपासल्यावर तिचा मृत्यू झाला अशी घोषणा केली.या घटनेत गावात शोककला पसरली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आधी रविवारी गोरखपूरमध्ये सत्र न्यायाधीश जयप्रकाश हे मॉर्निग वॉकसाठी आलेले असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला, या हल्लात ते किरकोळ जखमी झाले. देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. आजवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif