नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 10 जणांना अटक

धक्कादायक म्हणजे, अटक करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) तीव्र अंदोलन आणि हिंसाचार प्रकरणी 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, अटक करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात एकाही विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे. जामिया भागात पसरवलेल्या अफवा आणि आरोपांवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पत्रकार परिषद घेतली होती. यात नागरिकांनी अफवांपासून सावध राहण्याचा सल्लाही पीआरओ एम. एम. रंधावा यांनी दिला आहे.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आसाम, मेघालया या राज्यानंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्याठातील विद्यार्थींनीही अंदोलन केले होते. हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच पीआरओ एम. एम. रंधावा यांनी दिलेल्या माहितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात आणि जामिया नगर येथे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही तीव्र अंदोलन केली होती. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांनी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला, अशा १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एकाही विद्यार्थांचा समावेश नसल्याचे रंधावा यांनी सांगितले. तसेच अफवांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. हे देखील वाचा- जामिया मिलिया इस्लामिया येथे जे घडले ते जालियांवाला बागसारखे- उद्धव ठाकरे

एएनआय डिजीटलचे ट्विट-

दरम्यान, रंधावा म्हणाले की, 13 डिसेंबरपासून हे निषेध आंदोलन सुरु आहे.14 डिसेंबर रोजी देखील आंदोलन सुरुच होते. त्यावेळी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाखाली होती. त्यानंतर रविवारी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान आंदोलक माता मंदिर मार्ग भागापर्यंत पोहोचले. त्यानंतर बस पेटवण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी जमावाला जामियानगर भागाकडे पसरवण्यात सुरुवात केली. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर हल्लाही केला. रस्त्यातील एका हॉस्पिटलवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, 4 डीटीसी बस, एका पोलिसांच्या बाईकसह 100 पेक्षा अधिक वाहने पेटवण्यात आली होती. यामध्ये बहुतेक बाईक आणि काही कार्सचा समावेश होता. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.