Encounter in Jammu Kashmir: शोपियांच्या Zainapora भागातील चेरमार्ग येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला.

Encounter Representational Image (Photo Credits: PTI)

Encounter in Jammu Kashmir: दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील झैनापोरा (Zainapora) भागातील चेरमार्ग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. या परिसरात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यापूर्वी सुरक्षा दलांनी त्यांना शस्त्रे ठेवण्याची अनेकवेळा संधी दिली होती.

एक दहशतवादी मारला गेल्यानंतरही सुरक्षा कर्मचारी परिसरात लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगत आहेत. मात्र सध्या ही कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेरमार्ग, जैनपोरा येथे दहशतवादी दिसल्याची माहिती मिळताच एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तेथे पोहोचले आणि शोध मोहीम राबवली. (वाचा - Jaipur: PUBG खेळण्यासाठी आई-वडिलांनी वाढदिवसाला घेतला नाही नवा मोबाइल, 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या)

दरम्यान, सुरक्षा दलाचे पथक संशयित घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. सध्या चकमक सुरू आहे.

यापूर्वी, श्रीनगर शहरातील जाकुरा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. हे लोक एलईटी/टीआरएफ या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. काश्मीरचे आयजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख इखलाक हजम अशी आहे. हसनपोरा अनंतनाग येथील अली मोहम्मद यांच्या हत्येत त्याचा हात होता. त्यांच्याकडून 2 पिस्तुलांसह इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले.