Anurag Thakur On Drone Pilots: भारताला 2023 पर्यंत 1 लाख ड्रोन पायलटची गरज - अनुराग ठाकूर

ज्यामुळे उद्योगाद्वारे सुमारे 6,000 कोटी रुपयांचा रोजगार मिळेल.

Anurag Thakur (PC - Twitter/ @ianuragthakur)

Anurag Thakur On Drone Pilots: भारताला ड्रोन कौशल्य केंद्र बनवण्यासाठी 2023 पर्यंत किमान एक लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी सांगितलं. ड्रोन स्टार्ट-अप गरुड एरोस्पेसच्या ड्रोन टूरला फ्लॅग ऑफ करण्यासाठी आणि कंपनीच्या पहिल्या व्हर्च्युअल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यासाठी अनुराग ठाकूर अग्नी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथे आले होते. किसान ड्रोन ही कृषी क्षेत्रातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच होणार नाही तर इतर विविध लोकांसाठी रोजगारही निर्माण होईल, असं मत यावेळी ठाकूर यांनी व्यक्त केलं. कोविड-19 महामारीच्या काळात हिमाचल प्रदेशात शेतीचा पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा कसा वापर करण्यात आला होता, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

मंत्र्यांनी ऑपरेशनल अनुभव मिळविण्यासाठी ड्रोन देखील उडवले आणि ड्रोन सेवा प्रदाता बनण्याचा निर्णय घेतलेल्या तरुण उद्योजकांना 10 ड्रोन सुपूर्द केले. गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले, “आमचा ड्रोन प्रवास शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाबद्दल अधिक समजून घेण्यास मदत करेल आणि त्यांना पिके कशी वाढवायची याचा एक चांगला दृष्टीकोन देईल." (हेही वाचा -RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना पुन्हा झटका, आरबीआय रेपो दरात 0.35 बेसिस पॉइंट्सने वाढ)

पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, ड्रोनमुळे प्रत्येक पायलटला दरमहा 50,000 ते 80,000 रुपये कमवणे शक्य होईल. ज्यामुळे उद्योगाद्वारे सुमारे 6,000 कोटी रुपयांचा रोजगार मिळेल. याशिवाय ड्रोन वापरणाऱ्या उद्योग आणि सरकारी संस्थांवरही परिणाम होणार असल्याचे ठाकूर म्हणाले. येत्या दोन वर्षांत एक लाख ‘मेड इन इंडिया’ ड्रोन बनवण्याच्या गरुड एरोस्पेसच्या योजनेचे त्यांनी कौतुक केले. (हेही वाचा - Winter Session Of Parliament 2022: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; महाराष्ट्र सीमावाद गाजण्याची शक्यता)

गरुडची ड्रोन कौशल्य आणि प्रशिक्षण परिषद देशभरातील 775 जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. तरुणांसाठी लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी येत्या काही दिवसांत ही संख्या वाढेल. ठाकूर म्हणाले की प्रभावी धोरणे, उद्योगांना प्रोत्साहन आणि व्यवसाय सुलभता यासारखे घटक ड्रोन क्षेत्राला आवश्यक प्रेरणा देत आहेत.