Wall Collapses in Mathura: मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, 4 जण जखमी

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Wall Collapses in Mathura (फोटो सौजन्य - ANI)

Wall Collapses in Mathura: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरे (Mathura) च्या नई बस्ती (Nai Basti) येथील गोविंद नगर भागात घर कोसळल्याने शेजारच्या कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

मृत मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांच्या शेजारी जफर नावाचे घर सोमवारी पहाटे अचानक कोसळले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत त्यांच्या घराच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शेजारील कुटुंबीयांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा -Wall Collapse In Mumbai: मुंबईतील काळबादेवी येथे 7 फूट उंच भिंत कोसळली; 2 जणांचा मृत्यू)

दुर्दैवाने या घटनेत चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Wall Collapsed: चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू)

मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पहा व्हिडिओ - 

कुटुंबातील चार जणांवर अद्याप उपचार सुरू -

सरकारी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सुशील कुमार यांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी कुटुंबातील एक महिलाही गंभीर जखमी झाल्याचे नमूद केले. त्यांनी आयएएनएसला बोलताना सांगितले की, 'नई बस्ती येथे घराची भिंत कोसळली, त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेली एक महिला गंभीर जखमी झाली. तिच्या पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने, 2 वर्षांच्या मुलीचा या घटनेत मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे नईबस्तीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.