Yuzvendra Chahal ची बायको Dhanashree Verma चा Shikhar Dhawan सोबत गब्बर स्टाईल भांगडा; पहा धमाकेदार Video
गब्बरचा हॅप्पी गो लकी अंदाज यापूर्वी देखील अनेक व्हिडिओजमधून समोर आला होता. लॉकडाऊन दरम्यान शिखर धवनने कुटुंबियांसोबतचे डान्स व्हिडिओज पोस्ट केले होते.
इंग्लंड विरुद्ध वनडे सिरीजमधील आपल्या शानदार परफॉर्मन्सनंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) चा एक मजेशीर अंदाज समोर येत आहे. गब्बरचा 'हॅप्पी गो लकी' अंदाज यापूर्वी देखील अनेक व्हिडिओजमधून समोर आला होता. लॉकडाऊन दरम्यान शिखर धवनने कुटुंबियांसोबतचे डान्स व्हिडिओज पोस्ट केले होते. आता शिखरचा नवा डान्स व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओत शिखर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबत भांगडा करताना दिसत आहे. त्यांच्या या धमाकेदार डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धनश्री वर्माने हा व्हिडिओ शेअर केला असून पोस्टमध्ये तिने लिहिले की, "गब्बर स्टाईल मध्ये भांगडा. शिखर धवनने इंस्टाग्राम रिल्सवर आग लावली. जसे मी पूर्वी बोलले होते. आमची इनर्जी खूप काही बोलते." गब्बर स्टाईल भांगड्याचा हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. (Yuzvendra Chahal याची गर्लफ्रेंड Dhanashree Verma हिचा 'अफगान जलेबी' गाण्यावर हॉट डान्स; व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ:
नेटकरी शिखर आणि धनश्री यांच्या डान्सचे प्रचंड कौतुक करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून लाईक्स आणि सुमारे तीन लाख कमेंट्स मिळाल्या आहेत. आपल्या डान्समुळे धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. यापूर्वी देखील तिचे अनेक डान्स व्हिडिओज हिट ठरले आहेत.