Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये ह्या स्पर्धकांची होणार एन्ट्री? व्हायरल यादीबद्दल जाणून घ्या
बिग बॉस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. आगामी सीझनमध्ये कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही संभाव्य नावांची यादी समोर आली आहे, पाहा यादी
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा चौथा सीझन लवकरच येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होणार आहे. बिग बॉस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. आगामी सीझनमध्ये कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही संभाव्य नावांची यादी समोर आली आहे. स्पर्धकांच्या संभाव्य यादीमध्ये पहिले नाव, ‘तुझ्यात जीव रंंगला’ फेम राणादा म्हणजे हार्दिक जोशी यांचे आहे. यादीतील दुसरं नाव ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेते किरण माने यांचे आहे. अभिनेता किरण माने बिग बॉस या स्पर्धेमध्ये येणार अशी चर्चा चांगलीच रंगली होती. बिग बॉस खबरी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर स्पर्धकांची संभाव्य यादी शेअर करण्यात आली आहे.
पाहा यादी
पाहा, स्पर्धकांची यादी
बिग बॉस खबरी या पेजने शेअर केलेल्या यादीनुसार, मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे ‘बिग बॉस मराठी 4’ या शो मध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता या यादीमध्ये किती तथ्य आहे, ते येत्या काळात कळेलच.