Vinayak Mali Song Aarmutya: विनायक माळी याचे हळदी स्पेशल सॉन्ग 'आरमूट्या' रिलीज (Watch Video)
आरमूट्या म्हणजे बावळट असं कॅप्शन देत विनायक माळी या युट्युब चॅनलवर हे गाणे शेअर केले आहे.
लोकप्रिय युट्युबर विनायक माळी (Vinayak Mali) याचे पहिलेवहिले गाणे 'आरमूट्या' (Aarmutya) प्रदर्शित झाले आहे. आरमूट्या म्हणजे बावळट असं कॅप्शन देत विनायक माळी या युट्युब चॅनलवर हे गाणे शेअर केले आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेल्या विनायक माळी च्या हळदीचा समारंभ या गाण्यात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपल्या कॉमेडी व्हिडिओजनी अनेकांची मने जिंकणाऱ्या विनायकने गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. यात विनायकने हळदीसाठी सफेद कुर्ता-पायजमा घातला असून हातात सोन्याचे कडे, बोटात अंगठ्या आणि गळ्यात सोन्याच्या साखळ्या घातल्या आहेत. मुंडावळ्या आणि काळा गॉगल घालून विनायक अवली डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे.
नागेश मोरवेकर यांनी हे गाणे गायले असून कुणाल करण यांनी ते संगीतबद्ध केले आहे. तर विनायक याने या गाण्याची निर्मिती, दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या गाण्यातील धम्माल डान्सचे दिग्दर्शक अविनाश पायल यांनी केले आहे. (Agri Youtuber Vinayak Mali: युट्युब स्टार विनायक माळी कसा बनला आगरी किंग? जाणून घ्या त्याच्याबद्दल काही खास गोष्टी)
पहा व्हिडिओ:
हे गाणे म्हणजे विनायकच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. आरमुट्या गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या तासाभरात व्हिडिओला लाखभर व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, आगरी किंग विनायक माळी याच्या युट्युब चॅनलला 16.5 लाख सबस्क्रायबर्स असून येत्या मार्च महिन्यात त्याच्या चॅनलला 4 वर्ष पूर्ण होणार आहेत.