स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे 'युवा सिंगर एक नंबर' च्या मंचावर
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने स्वप्नील आणि बेलाची सर्व स्पर्धकांसोबत ओळख करून दिली.
'युवा सिंगर एक नंबर' हा रिऍलिटी शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून स्पर्धकांमधील चुरस अधिकच वाढताना दिसत आहे. परंतु त्यांना नुकतेच एक खास सरप्राईझ मिळाले.
महाराष्ट्राचा लाडके व तरुणाईत अत्यंत प्रसिद्ध असलेले गायक बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी 'युवा सिंगर एक नंबर' च्या मंचावर खास उपस्थिती दर्शवली. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने स्वप्नील आणि बेलाची सर्व स्पर्धकांसोबत ओळख करून दिली.
आलेल्या पाहुण्यांना आपणही आपल्या गायकीतून काहीतरी खास भेट द्यावी म्हणून सर्वच स्पर्धकांनी स्वप्नील आणि बेलाची गाणी सादर केली. वैष्णवीने बेलाचे, 'राती अर्ध्या राती' हे प्रसिद्ध गाणे तिच्यासमोर सादर केले. तर विशाल सिंग याने स्वप्निल बांदोडकरचे 'राधे कृष्ण नाम' हे गीत सादर करण्याचे आव्हान स्वीकारले.
वैभव मांगले 'युवा सिंगर एक नंबर' चा परीक्षक; झी युवा वर 7ऑगस्ट पासून नवा रिऍलिटी शो
स्पर्धकांमधील उत्साह पाहून स्वप्नील आणि बेलालासुद्धा गाण्याचा मोह आवरला नाही. स्वप्नीलने 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वे यांच्या 'ट्रिपल सीट' सिनेमातील एक गाणं सादर केलं तर बेलानेसुद्धा सगळ्यांच्या आग्रहाखातर तिच्या 'राती अर्ध्या राती' या गाण्याची एक छोटीशी झलक प्रेक्षकांसाठी सादर केली.