बॉलिवूडची 'उमराव जान' अभिनेत्री रेखा 'गुम है किसी के प्यार में' या हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर करणार पदार्पण, पाहा त्यांचा दिलखेचक प्रोमो

या प्रोमो मध्ये रेखा स्वत: 'गुम है किसी के प्यार' हे गाणे गाताना दिसत आहे. यात त्यांनी 'हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असून यात काही तरी एक गोष्ट दडलेली आहे. ज्यात प्रेमाची वाट पाहू शकतो मात्र त्याचे नाव घेण्याचा परवानगी नाही' असे रेखा सांगत आहे.

Veteran Actress Rekha (Photo Credits: Instagram)

'इन आंखों की मस्ती में' या गाण्यामधून आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या सिनेसृष्टीला वेडं लावणारी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Veteran Actress Rekha) आता छोट्या पडद्यावरही आपली जादु पसरवण्यास सज्ज झाली आहे. अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या अभिनेत्री रेखा आता स्टार प्लसवरील (Star Plus) 'गुम है किसी के प्यार में' (Gum Hai Kisi Ke Pyar Me) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेखा यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागणार आहे. त्यांच्या एक झलक पाहण्यासाठी आसुसलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.

या प्रोमो मध्ये रेखा स्वत: 'गुम है किसी के प्यार' हे गाणे गाताना दिसत आहे. यात त्यांनी 'हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असून यात काही तरी एक गोष्ट दडलेली आहे. ज्यात प्रेमाची वाट पाहू शकतो मात्र त्याचे नाव घेण्याचा परवानगी नाही' असे रेखा सांगत आहे. अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

 

View this post on Instagram

 

Jab dil kisi ke pyaar mein subah shaam ghum rahe to mohabbat ibadat bann jaati hain. #RekhaGhumHaiKisikeyPyaarMeiin #GhumHaiKisikeyPyaarMeiin, 5 October se, Raat 8 baje sirf StarPlus aur Disney+ Hotstar par. #Rekha @bhatt_neil @Ayesha.singh19 @aisharma812

A post shared by StarPlus (@starplus) on

या प्रोमोमधील रेखा यांच्या मादक नजरा, दिलखेचक अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या आहेत. वयाची 65 वर्ष पूर्ण करुनही त्यांच्या सौंदर्यात तसूभरही कमी झाली नाही उलट ते आणखीनच खुलून आलेले या प्रोमो मध्ये दिसत आहे. मात्र या मालिकेत रेखा स्वत: काही भूमिका करणार की काही दिवस पाहुणा कलाकार म्हणून काम करणार हे येणा-या काही दिवसात कळेल. 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका 5 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह रोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या प्रोमोमागचे रहस्य हे त्याच दिवशी सर्वांना कळेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now