वैभव मांगले 'युवा सिंगर एक नंबर' चा परीक्षक; झी युवा वर 7ऑगस्ट पासून नवा रिऍलिटी शो

Vaibhav Mangle (Photo Credits: Zee5)

झी युवा (Zee Yuva)  वाहिनीवर येत्या 7ऑगस्ट पासून युवा सिंगर एक नंबर (Yuva Singer Ek Numbar) हा नवा रिऍलिटी शो (Reality show) सुरु होत आहे, काही दिवसांपूर्वीच या शो चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, यामध्ये सर्वाना एकच प्रश्न पडला होता आणि तो म्हणजे या स्पर्धेचा परीक्षक कोण असणार? अखेरीस आता या प्रश्नाचे उत्तर गवसले आहे. मराठी चित्रपट, नाटक, सीरियल्स मधून समोर आलेला अवली कलाकार वैभव मांगले (Vaibhav Mangle) या शो च्या परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे.

'या आधी वैभवने अनेक ढंगाच्या भूमिका केल्या आहेत, सध्या तो रंगभूमीवर अलबत्या खलबत्य्या (Albattya Galbattya)  नाटकांतून चेटकिण बनून सर्वांसमोर येत आहे. तसेच आजवर त्याने अभिनयासोबतच एक उत्तम गायक म्हणूनही प्रेक्षकांवर आपली छाप पडली आहे, त्यामुळे यावेळेस परीक्षक म्हणूनही तो उत्तम कामगिरी करेल असा विश्वास दर्शवण्यात येत आहे. कॅन्सर वर मात पुन्हा सज्ज झालेल्या शरद पोंक्षे साठी किशोर कदम यांचा भावनिक संदेश

युवा सिंगर एक नंबर प्रोमो (Watch Video)

दरम्यान, संगीत सम्राट या यशस्वी कार्यक्रमानंतर आता झी युवा हा नवा सिंगिंग रिऍलिटी शो घेऊन येत आहे. संगीत सम्राटचे परीक्षण राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे यांनी केले होते, या कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता युवा सिंगर एक नंबर शो साठी देखील प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र यासाठी वैभव मांगले हा एकटाच परीक्षक असणार आहे की सोबत आणखी परीक्षकाची नाव सुद्धा जोडली जातील हे स्पष्ट केलेले नाही. शिवाय अलबत्या गलबत्या नाटकाच्या 3000 प्रयोगाचे ध्येय पूर्ण करताना परीक्षक म्हणून वैभव कशाप्रकारे वेळ काढणार आहे हे पाहणे महत्वाचे  ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif