'तेरी आँखा का यो काजल' (Teri Aakhya Ka Yo Kajal, ) या सुपरहिट गाण्यातून तसेच ते बिग बॉस (Bigg Boss) च्या मागील पर्वातून प्रेक्षकांसमोर हिट ठरलेली डान्सिंग स्टार सपना चौधरी (Sapna Choudhary) हिचा एक अगदी बोल्ड अंदाज इंस्टाग्राम व्हायरल होत आहे. खरंतर बिग बॉसच्या किंवा लाईव्ह डान्सिंगच्या शोज मध्ये आपण सपनाला पंजाबी सलवार कुर्ता घालून लटके झटके देताना पहिले आहे पण आता व्हायरल होत असणाऱ्या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदी मॉडर्न कपडे घालणाऱ्या मॉव्ही स्टार इतका स्टयलिश दिसून येत आहे, अनेकांनी तर तिच्या या ट्रान्सफॉर्मेशन कडे पाहता अक्षरशः तोंडात बोटे घातली आहेत. निळ्या रंगातील साडीमधील सपना चौधरी हिचा हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सपना चौधरीने हरियाणातील चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती हिंदी बिग बॉसमध्येही दिसली होती. बिग बॉसमध्ये ती चांगलीच चर्चेत आली होती. घराघरात तिच्या नावाचीच चर्चाही रंगू लागल्या होत्या. विशेष म्हणजे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला लगेचच भोजपूरी चित्रपटाची ऑफर मिळाली. या वेगाने तिची होत असणारी प्रगती पाहता काहीच दिवसात तिला जर का बॉलिवूडमध्ये देखील एंट्री मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, पण तत्पूर्वी चला तर पाहुयात तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची एक झलक
सपना चौधरी इंस्टाग्राम पोस्ट
दरम्यान, इंस्टाग्राम वर सपनाची फॅन्स फॉलोईंग अगदीच तगडी आहे, इतकेच नव्हे तर तिच्या नावाचे अनेक फॅन्स पेजेस देखील अगदी ऍक्टिव्हली सुरु आहेत. तिच्या या बदललेल्या लूकसाठी अनेकांडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरियाणामधील एका छोट्याश्या गावातून सपना चौधरीने आपला प्रवास सुरु केला होता. आज सपना चौधरीचं नाव प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या यादीत आहे.