'Tarak Mehtaka' फेम 'बबीता जी' हिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल, वाल्मीकी समाजाचा अपमान केल्याचा आरोप
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील फेम बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Datta) हिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील फेम बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबोली पोलिसांनी अभिनेत्रीच्या विरोधात हे प्रकरण दाखल केले आहे. मुनमुन दत्ता हिच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियात एक व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये तिने असे म्हटले की, मी युट्युबर सुद्धा येणार आहे. तक्रारकर्त्यांनी आरोप केला की, या दरम्यान तिने ही गोष्ट सांगताना वाल्मीकी समाजाचा आरोप सुद्धा केला.
मुनमुन दत्ता हिने ही पोस्ट 10 मे रोजी केली होती. त्यानंतर 26 मे रोजी तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता हिच्यावरअॅट्रासिटी मधील कलम 3(प) (1) (त) (5) (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्यांनी पुढे असे म्हटले की, ज्या इंस्ट्राग्राम प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर केला आहे त्यावर लाखो युजर्स आहेत. हा व्हिडिओ पाहून समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे वाटले असेल. यासाठीच मुनमुन दत्ता हिच्या विरोधात तातडीने एफआयआर दाखल करुन तिला अटक करण्यात यावी.(Bombay Begums च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदविण्याच्या मागणीसाठी NCPCR चे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र)
Tweet:
दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या व्हिडिओत दलित समाजासाठी जातीवरुन काही शब्दांचा वापर केला. तिच्या या कमेंट नंतर सोशल मीडियात तिच्यावर युजर्सकडून टीका करण्यात आली. तसेच काहींनी या व्हिडिओवर संताप ही व्यक्त केला. आपली चुक झाल्याचे कळताच मुनमुन हिने इस्ट्राग्रामवरुन तो व्हिडिओ डिलिट करत स्पष्टीकरण दिले.