Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील दयाबेन उर्फ Disha Vakani चा हॉट डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहुन चाहते होतील थक्क
Disha Vakani Dance Video (Photo Credits: Youtube)

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय टीव्ही शो मधील दयाबेन (Dayaben) ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) चा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या कॉमिक अंदाज आणि कमाल एक्सप्रेशनने दिशाने आतापर्यंत प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. सध्या ब्रेक वर असलेल्या दिशाची पुन्हा शो मधील एन्ट्रीसाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यादरम्यान दिशाचा एक जूना डान्स व्हिडिओ (Dance Video) सध्या व्हायरल (Viral) होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा आहे.

व्हिडिओमध्ये दयाबेन उर्फ दिशा वकानी 'भिंगरी ग भिंगरी' (Bhingri Ga Bhingri) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिशाने सिव्हर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून कोस्टार बंटी सोबत डान्स करत आहे. दिशाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना थक्क करत असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. (रिया चक्रवर्ती पासून दयाबेन उर्फ Disha Vakani पर्यंत 'हे' कलाकार सामील होऊ शकतात बिग बॉस 15 मध्ये)

पहा व्हिडिओ:

तारक मेहता शो मधील दिशाच्या कमबॅकबद्दल निर्माते असित कुमार मोदी यांनी एप्रिलमध्ये ई-टाईम्सशी बोलताना सांगितले की, "प्रेक्षक दीर्घ काळापासून दयाबेनची वाट पाहत आहेत. त्यांच्या भावना मी समजतो आणि दिशा लवकरात लवकर शो मध्ये परत यावी, हीच माझी देखील इच्छा आहे." दरम्यान, शो मध्ये पुन्हा दयाबेनला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र दिशा परतणार अशा केवळ बातम्या  येत आहेत. परंतु, दिशा वकानीची एन्ट्री अद्याप शोमध्ये झालेली नाही.