Swanandi Tikekar-Ashish Kulkarni: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने दिली आशिष कुलकर्णी सोबतच्या प्रेमाची कबुली; जाणून घ्या या सुरेल जोडप्या बाबत
स्वानंदीच्या घरातच अभिनय आणि गायनाचा वारसा आहे. मागील काही वर्षांत ती गाण्याच्या अधिक जवळ आल्याचे तिने सांगितलं होतं.
लिटील चॅम्प्स मधील पंचरत्न मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता संगीत क्षेत्रातून अजून एका सुरेल जोडीने प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) ने गायक आशिष कुलकर्णी (Ashish KulkarniSwanandi Tikekar-Ashish Kulkarni) सोबतच्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. इंस्टाग्रामवर दोघांचा एकत्र क्यूट फोटो शेअर करत #love #aamchatharla असं म्हणत त्यांनी चाहत्यांना हा आनंदाचा धक्का दिला आहे. दरम्यान त्यांच्या इंस्टा पोस्ट वर सिनेक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रख्यात गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची एकुलती एक लेक आहे. स्वानंदीला अभिनयासोबतच गाण्याचे ज्ञान आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहचलेल्या स्वानंदीने ‘सिंगिंग स्टार’चे विजेतेपद देखील पटकावले आहे. तर आशिष कुलकर्णी हा तिचा प्रियकर देखील संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. आशिष ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’2008 चा स्पर्धक होता पण काही वर्षांपूर्वी 'इंडियन आयडॉल सीझन 12' मध्ये सहभागी होत त्याने लोकप्रियता मिळवली होती. सोबतच 2015 मध्ये त्याने मित्रांसोबत ‘रॅगलॉजिक’ हा संगीत बँड बनवला. हार्ड रॉक कॅफे, हाय स्पिरिट्स, ब्लूफ्रॉग यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडसोबत त्याने काम केलेले आहे. नक्की वाचा: अभिनेत्री Veena Jagtap चं पुन्हा मेट्रोमोनियल साइटवर फेक अकाऊंट; स्क्रिनशॉर्ट शेअर करत व्यक्त केला संताप!
स्वानंदीची पोस्ट
स्वानंदीच्या घरातच अभिनय आणि गायनाचा वारसा आहे. मागील काही वर्षांत ती गाण्याच्या अधिक जवळ आल्याचे तिने सांगितलं होतं. सध्या स्वानंदी टेलिव्हिजन वर दिसत नसली तरीही तिच्या चाहत्यांमध्ये तिची अभिनेत्री आणि गायिक म्हणून असलेली ओळख कायम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)