BestSeller Trailer: मिथुन चक्रवर्तीच्या पहिल्या वेब सीरिज 'बेस्टसेलर'चा सस्पेन्स-थ्रिलर ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ

मिथुन यांनी सांगितलं की, जगभरातील सस्पेन्स आणि थ्रिलर चाहत्यांना बेस्टसेलर नक्कीच आवडेल.

BestSeller Trailer (PC - Twitter)

BestSeller Trailer: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) चित्रपट आणि टीव्हीच्या दीर्घ करिअरनंतर आता ओटीटीच्या जगात पाऊल ठेवत आहेत. मिथुन अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या बेस्टसेलर (Bestseller) वेब सीरिजमधून OTT पदार्पण करत आहे. ही सीरिज 18 फेब्रुवारीला प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून मंगळवारी तिचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. बेस्टसेलर हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर सस्पेन्स ड्रामा आहे.

या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अल्केमी प्रॉडक्शन्स एलएलपीने या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजची कथा एका हायप्रोफाईल कादंबरीच्या लेखकाभोवती फिरते, जो एका चाहत्याच्या हातावरच्या जखमांची कहाणी जाणून घेतल्यानंतर त्याच्या बेस्टसेलर कादंबरीचा सिक्वल लिहितो. या मालिकेत अर्जन बाजवा लेखकाच्या भूमिकेत आहे, तर श्रुती हासन त्याच्या चाहत्याच्या भूमिकेत आहे. मिथुन चक्रवर्ती एसीपीच्या भूमिकेत आहेत, जो हत्येचा तपास करत आहे. (वाचा - Munmun Dutta Arrest: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्ताला अटक; 4 तासांनंतर जामिनावर सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण)

मिथुन यांनी सांगितलं की, “माझ्याकडे यापेक्षा चांगले स्ट्रीमिंग पदार्पण होऊ शकले नसते. माझा मुकुल अभ्यंकर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की, त्यांनी अत्यंत मनोरंजक थ्रिलर तयार करण्यात प्रशंसनीय काम केले आहे. जगभरातील सस्पेन्स आणि थ्रिलर चाहत्यांना बेस्टसेलर नक्कीच आवडेल."

श्रुती हसन देखील या सीरिजला तिचे डिजिटल पदार्पण मानते. श्रुती म्हणाली की, “बेस्टसेलर हा माझा पूर्ण-फिचर डिजिटल पदार्पण आहे. याचा मला आनंद झाला आहे. जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राने बेस्टसेलरसाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत होते. पण ज्या क्षणी मी स्क्रिप्ट पाहिली, त्यावेळी मी ती स्क्रिप्ट वाचत राहिले. मी कथेतील इतकी गुंतले की, मला माझे पात्र इतके आकर्षक वाटले की, मला ते साकारावे वाटले."

अर्जन बाजवा म्हणाले की, "मी ताहिर वजीर या यशस्वी आणि स्पष्टवक्ते लेखकाच्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे, ज्याचे आयुष्य एका अनोळखी व्यक्तीशी टक्कर घेतल्यानंतर खूप मोठे वळण घेऊन जाते. या व्यक्तिरेखेची भूमिका आव्हानात्मक होती, परंतु त्याचवेळी ताहिरला अभिनेता म्हणून साकारणे हा एक उत्तम अनुभव होता." या सीरिजमध्ये सत्यजित दुबे, गौहर खान आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now