Bigg Boss Marathi 5: 'वेड' चित्रपटातील शुभंकर तावडे दिसणार बिग बॉसच्या घरात? त्याच्या नावाची जोरदार चर्चा
यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक बिग बॉस मराठीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत.
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)करणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक बिग बॉस मराठीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. रोज नव्या कंटेस्टंटची घोषणा बिग बॉसकडून(Bigg Boss Marathi 5) केली जात आहे. आता आणखी एका कंटेस्टंटच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा कंटेस्टंट 'वेड' चित्रपटातील अभिनेता आहे. (हेही वाचा:Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी'मधील लोकप्रिय अभिनेता बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी; 'या' पोस्टमुळे झाला खुलासा )
लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यादेखील कार्यक्रमात दिसणार आहेत असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. त्यामुळे त्यांनी चार वर्षांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून निरोप घेतला. आता नुकतचं करण्यात आलेल्या इन्स्टा पोसट नुसार 'वेड' चित्रपटातील शुभंकर तावडे हा बिग बॉसच्या घरात प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही घरात दिसणारा असल्याचं बोललं जात होतं. (हेही वाचा:Big Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात 'या' गायकाची होणार एन्ट्री, जगभरातं गाजलं होतं गाणं, सोशल मीडियावर चर्चा सुरु )
पोस्ट पहा
त्याशिवाय, दोस्तीच्या दुनियेतील खरा यार म्हणून प्रणव रावराणे याच्या नावाची चर्चा आहे. तर रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशी याच्याही नावाची चर्चा आहे. त्याशिवाय, नव्या प्रोमोमध्ये 'वेड लावणारं प्रेम तर यांच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?' असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवरून अनेकांनी दोन ते तीन अभिनेत्यांची नावं घेतली. यात आकाश ठोसर, प्रथमेश परब यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यात सगळ्यात जास्त अभिनेता शुभंकर तावडे याचं नाव घेतलं जातंय. 'वेड' या चित्रपटात रितेश देशमुख याच्यासोबत शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आता शुभंकर या कार्यक्रमात दिसणार की नाही हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.