Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी'मधील लोकप्रिय अभिनेता बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी; 'या' पोस्टमुळे झाला खुलासा

बिग बॉस मराठी 5 या पर्वाची मराठी मनोरंजन विश्वात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच दुनियादारीमधील लोकप्रिय अभिनेता बिग बॉस मराठी 5मध्ये सहभागी होणार असल्याचे समोर आले आहे.

Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी'मधील लोकप्रिय अभिनेता बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी; 'या' पोस्टमुळे झाला खुलासा
Photo Credit- x

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५ या पर्वाची मराठी मनोरंजन(Marathi Entertainment) विश्वात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमध्ये कोण कोण असणार, कोणते टास्क असणार, यंदाची थीम काय असणार असे अनेक प्रश्न बिग बॉसच्या चाहत्यांना पडले आहेत. अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असलेले हे पर्व पुढील रविवारपासून सुरू होणार असून, 28 जुलै रोजी BBM5 चा ग्रँड प्रीमियर होणार आहे. बिग बॉस मराठी ने 'बिग बॉस मराठी ५'चा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये दुनियादारी (Duniyadari Movie)या चित्रपटातील एक कलाकार बिग बॉसच्या घरात येणार आहे असे म्हटले आहे. त्याशिवाय, कलर्स मराठीने ही एक प्रोमो शेअर केला आहे.(हेही वाचा:Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी होस्ट आणि संभाव्य स्पर्धक घ्या जाणून)

दुनियादारी या चित्रपटातील एक कलाकार बिग बॉसच्या घरात येणार आहे ओळखा पाहू कोण आहे हा कलाकार. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी”चा Grand Premiere २८ जुलै, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.' असे लिहिले आहे.

हा प्रोमो शेअर करताना बॅकग्राउंडला 'दुनियादारी' सिनेमातील 'जिंदगी जिंदगी' हे गाणे वापरण्यात आले आहे. याशिवाय कॅप्शनमध्ये वापरण्यात आलेला दोस्तीचा संदर्भ, यामुळे मैत्रीवर आधारित 'दुनियादारी' चित्रपटातील कलाकार या सिनेमात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. आता नेमका कोणता कलाकार बिग बॉस मराठी ५मध्ये दिसेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याआधी कोकणातील इन्फ्लूएन्सर अंकिता वालावकर आणि अलीकडेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर या दोघी 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री करणार असे बोलले जाते आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).