Super Dancer 4 शोमध्ये परतली शिल्पा शेट्टी; पहा व्हिडिओ

काल शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यात ती सेटवर एंट्री करताना दिसत होती.

Shilpa Shetty (Image Credit: Instagram)

पॉर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक झाल्यानंतर तब्बल महिन्याभराने अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सुपर डान्सर 4 (Super Dancer 4) शो मध्ये परतली आहे. काल शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यात ती सेटवर एंट्री करताना दिसत होती. त्यानंतर आता शो चा प्रोमो (Promo) रिलीज झाला आहे. त्यात शिल्पा पूर्वीप्रमाणेच स्पर्धकांना दिलखुलास दाद देताना दिसत आहे. शिल्पा शेट्टीचा लूक, हसणं, दाद देणं प्रेक्षकांना भावत असून टेन्शन मागे टाकून पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे.

अश्लील फिल्म प्रकरणात राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही काळ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांपासून अभिनेत्री लांब होती. काही दिवसांनी एक खास पोस्ट करत शिल्पाने आपली भूमिका स्पष्ट केली. मधल्या काळात शिल्पा शो च्या शुटींगलाही हजर राहत नसल्याने शिल्पाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्री वर्णी लागणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र शिल्पाच्या शो मध्ये परण्याने यांना पूर्णविराम लागला आहे. (राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ने प्रथमच Statement जारी करत व्यक्त केल्या भावना; पहा काय म्हणाली)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

यापूर्वी शिल्पाची बहिण अभिनेत्री शमिका शेट्टी देखील बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाली आहे. त्यानंतर आता शिल्पाची देखील सुपर डान्सर शो मध्ये परतली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सातत्याने होत असलेल्या आरोपांवरुन शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा केला होता. मात्र कोर्टाकडून शिल्पाला कोणताही दिलासा मिळाला नाही.