Shaktimaan New Timing: दूरदर्शन वर आजपासून शक्तिमान येणार भेटीला; पहा प्रक्षेपणाची नवीन वेळ

आज, 1 एप्रिल पासून शक्तिमान (Shaktimaan) या जुन्या सिरियलचे पुनःप्रक्षेपण सुरु होणार आहे, यापूर्वी ही सीरियल दुपारी १ ते २ या वेळेत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता या वेळेत बदल करून दुपार ऐवजी रात्री ८ वाजता शक्तिमानचे प्रक्षेपण होईल असे समजत आहे.

shaktiman (Photo Credit : Instagram )

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) लॉक डाऊन (Lock Down) काळात घरबसल्या कंटाळलेल्या मंडळींसाठी दूरदर्शन वाहिनीने (DD national)  उत्तम टाईमपास आणला आहे. दूरदर्शनच्या गाजलेल्या काही जुन्या मालिका या काळात पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातीलच एक म्हणजे शक्तिमान. आज, 1 एप्रिल पासून शक्तिमान (Shaktimaan) या जुन्या सिरियलचे  पुनःप्रक्षेपण सुरु होणार आहे, यापूर्वी ही सीरियल दुपारी 1 ते 2  या वेळेत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता या वेळेत बदल करून दुपार ऐवजी रात्री 8  वाजता शक्तिमानचे प्रक्षेपण होईल असे समजत आहे. याविषयी शक्तिमान च्या भूमिकेतील मुख्य अभिनेते म्हणजेच मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ( हे ही वाचा-  दूरदर्शन वर रसिकांच्या भेटीला पुन्हा येणार ' श्रीमान श्रीमती', 'चाणाक्य' सारख्या दर्जेदार मालिका; पहा या मालिकांच्या पुर्नप्रक्षेपणाच्या वेळा )

मुकेश खन्ना यांनी ट्विट करून मी आज पासून तुम्हा सर्वांच्या भेटीला येत आहे, रात्री आठ वाजता DD National वाहिनीवर शक्तिमान चे प्रक्षेपण पाहायला विसरू नका असे सांगितले आहे. Google 3D Animals Video Tutorial: 'या' सोप्प्या टिप्स वापरून Tiger, Giant Panda, Lion, Tiger आणि Penguin ला डिजिटली आणा तुमच्या घरी! (Watch Video).

मुकेश खन्ना ट्विट

दरम्यान, सुरुवातीला लॉक डाऊन काळात केवल रामायण व महाभारत प्रक्षेपण करण्याचा निर्णय दूरदर्शन वाहिनीतर्फे घेण्यात आला होता मात्र या दोन मीडियावर शक्तिमान सुद्धा दाखवा अशा मागणीने जोर धरला.

Lockdown :  सोशल मिडिया वर शक्तिमान मालिकेच्या मिम्स चा धुमाकूळ - Watch Video

याच पार्श्वभूमीवर आजपासून दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा एकदा गाजलेली सीरियल शक्तिमान पुन्हा दाखवली जाणार आहे. यापूर्वीच सोशल मीडियावर पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. शक्तिमान सोबतच अनेक अन्य जुन्या मालिका जसे की श्रीमान श्रीमती , चाणक्य या सुद्धा पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहेत.