Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule: बिग बॉसच्या घरात Sangram Chougule याच्या रुपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

चौगुले हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरला आहे. बॉडीबिल्डर असलेला संग्राम बिग बॉसच्या घरात काशी कामगिरी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुख यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

Sangram Chougule | (Photo Credit- Instagram)

'बिग बॉस मराठी' पाचवा हंगाम (Bigg Boss Marathi Season 5) सुरु होऊन आता सातवा आठवडा सुरु झाला. काही स्पर्धक घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतून बाद झाल्यानंतर काही जागा रिक्त झाल्या. गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी घनश्याम दराडे घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुले (Sangram Chougule) याच्या रुपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. चौगुले हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरला आहे. बॉडीबिल्डर असलेला संग्राम बिग बॉसच्या घरात काशी कामगिरी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुख यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

 

स्पर्धकांना सूर गवसतो आहे

बिग बॉसचा पाचवा हंगाम सुरु झाला तेव्हा कार्यक्रमाला सुरुवातीचे काही काळ सूर गवसला नव्हता. पण, जसजसे आठवडे पुढे सरकु लागल तसतसा हंगाम प्रवाहीत होऊ लागला. कार्यक्रमातील स्पर्धक धमाल करु लागले. खास करुन सूरज चव्हाण, डीपी, आर्या, निक्की तांबोळी, जान्हवी, पॅडी कांबळे, अभिजित सावंत आणि वर्षा उसगावकर हे कलाकार विशेष कामगिरी दाखवू लागले. घरातील स्पर्धाकंनी केलेले हास्य विनोद, कधी त्यांच्यात होणार संघर्ष, राडा हा प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरत होता. होस्ट रितेश देशमुख यांचे सूत्रसंचालनही हळूहळू पकड मजबूत करत आहे. त्यातच आता संग्राम चौगुले याची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्याच्या प्रवेशामुळे घरात काय धमाल होते हे आता लवकरच कळणार आहे. (हेही वाचा, Kangana Ranaut in Bigg Boss Marathi: कंगना रनौत यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री; सदस्यांशी साधला संवाद)

संक्राम चौगुले वर्काऊट व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Sangram B Chougule (@sangram_chougule_official)

संग्राम चौगुले याची कामगिरी

संग्राम चौगुले हा मुळचा कोल्हापूरचा आहे. तो एक शरीरसौष्ठवपटू असून सध्या पुणे येथे स्थायिक आहे. बॉडीबिल्डींग स्पर्धेमध्ये त्याने अनेक पदके जिंकली आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो सहा वेळा 'मिष्टर इंडिया' तर सन 2012 आणि 2014 चा 'मिष्टर युनिव्हर्स' आहे. त्याने अभिनयक्षेत्रातही काम केले आहे. 'दंभ' या 2016 मध्ये आलेल्या चित्रपटातून त्याने अभिनयात क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. शिवाय त्याने 'आला माझ्या राशीला' मध्येही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याचे सोशल मीडिया मंच इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन्स इतके फॉलोवर्स आहेत. शिवाय सोशल मीडियाच्या इतरही शाखा (फेसबुक, एक्स) असलेल्या मंचावरही त्याचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. (हेही वाचा, Bigg Boss Marathi Season 5: 'जान्हवीसारख्या चिल्लर सदस्याच्या कलकलाटाकडे…'; अमेय खोपकर यांची पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट)

बिग बॉस हा एक स्पर्धात्मक खेळ आहे. विशिष्ट लोकांना काही निश्चित काळासाठी सामाजापासून दूर ठेवत एका घरात बंदिस्त करुन ठेवणे. त्यांचा जनसंपर्क खंडीत करुन केवळ मर्यादित लोकांच्याय समूहात (14 ते 15) त्यांना ठेवणे आणि त्यांच्या भावभावनांसह वर्तन चित्रीत करुन ते लोकांपर्यंत आणने आणि त्यातून मनोरंजन करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ठ आहे.