Sai Lokur Engagement Photos: सई लोकूर चा झाला अखेर साखरपुडा, कोण आहे सईचा जोडीदार, पाहा या सोहळ्याचे सुंदर फोटोज
हे फोटो पाहून तरी हा इंडस्ट्रीतील नसल्याचा दिसत आहे.
अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिने सोशल मिडियावर आपल्याला आपला जोडीदार मिळाल्याची बातमी सांगताच सईच्या घरी लगीनघाई, सई लोकूर चढणार बोहल्यावर अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यात तिने देखील आपल्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यात तिने तिच्या जोडीदाराचा फोटो गुलदस्त्यातच ठेवला होता. त्यामुळे हा कोण आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र या सर्वांवरून सईने आता पडदा उठवला असून नुकतेच तिने आपल्या साखरपुड्याचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे तिचा हा जोडीदार कोण आहे हे तुम्हाला फोटोज पाहिल्यावर दिसेल. यामुळे लेटेस्टली मराठीने म्हटल्याप्रमाणे हे सईचे लग्न नसून तिचा साखरपुडा होणार असल्याची बातमी खरी ठरली.
सईच्या होणा-या नव-याचे नाव आहे तीर्थदिप रॉय (Tirthadeep Roy). हे फोटो पाहून तरी हा इंडस्ट्रीतील नसल्याचा दिसत आहे. Sai Lokur च्या हातावर चढला मेहंदीचा रंग, Mehendi मधील 'हे' चित्र पाहून सईच्या साखरपुड्याचे मिळतायत संकेत
या फोटोमध्ये सई आणि तीर्थदिप या दोघांच्या गळ्यात फुलांचे हार दिसत असून एकमेकांना अंगठी घालताना देखील फोटोज आहेत.
सईने आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तिच्या होणा-या नव-याला सुंदर खळी आहे. म्हणूनच तिने #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला होता.
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.