Sai Lokur च्या हातावर चढला मेहंदीचा रंग, Mehendi मधील 'हे' चित्र पाहून सईच्या साखरपुड्याचे मिळतायत संकेत

मात्र जर तुम्ही तिच्या हातावरील मेहंदी डिझाईन्स नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की यात एक मुलगा आणि मुलगी दाखवले आहेत. ज्यात मुलगा मुलीसमोर गुडघ्यावर बसून तिचा हात पकडला आहे. यावरुन कदाचित सईचा साखरपुडा होऊ शकतो असे संकेत मिळत आहे.

Sai Lokur च्या हातावर चढला मेहंदीचा रंग, Mehendi मधील 'हे' चित्र पाहून सईच्या साखरपुड्याचे मिळतायत संकेत
Sai Lokur Mehendi Designs (Photo Credits; Instagram)

बिग बॉस मराठी 1 (Bigg Boss Marathi 1) मध्ये मेधा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग यांची मैत्री जितकी गाजली तितकी दुश्मनीही. मात्र शो संपल्यानंतर ऑफस्क्रीन हे चांगले मित्र राहिले. यात अविवाहित असलेल्या सईने आपल्याला पुष्कर जोग आवडतो असे अनेकदा कळत नकळत बोलून दाखवले होते. त्यामुळे ते चर्चेत देखील आले होते. तसेच अनेकांकडून त्यांच्यावर टिका देखील होत होती. मात्र याच सई लोकुरने (Sai Lokur) काही दिवसांपूर्वी आपल्याला आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळाला असल्याचे सांगत आपण प्रेमात पडलो असल्याची कबुली सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली. यात तिच्या प्रियकराचा फोटो पाठमोरा असल्यामुळे सईचा हा जोडीदार कोण आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यात आता सईने आपल्या हातावरील मेहंदीचे फोटो (Mehendi Photo) इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्यामुळे आता सई लवकरच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

मात्र जर तुम्ही तिच्या हातावरील मेहंदी डिझाईन्स नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की यात एक मुलगा आणि मुलगी दाखवले आहेत. ज्यात मुलगा मुलीसमोर गुडघ्यावर बसून तिचा हात पकडला आहे. यावरुन कदाचित सईचा साखरपुडा होऊ शकतो असे संकेत मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Mujhe apni preet vich rang de ❤️

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

हेदेखील वाचा- Sai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी

सईने आपल्या घट्ट मिठी मारतानाचा देखील फोटो शेअर केला आहे. मात्र यातही तो फोटोकडे पाठ करून उभा आहे. मात्र सईने त्याखाली #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे तिच्या होणा-या नव-याच्या गालावर खळी पडत असावी असा अंदाज व्यक्त करायला हरकत नाही. त्यामुळे एकूणच तिच्या चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे की हा नक्की आहे तरी कोण?

 

View this post on Instagram

 

And here he comes ❤️ . #mydimpledguy

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

त्यामुळे सईचा साखरपुडा होतो की तिचे लग्न हे काही दिवसांतच कळेल. तशी सई सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे तिच्या घरात होणा-या मंगल सोहळ्याचे फोटो ती लवकरच पोस्ट करेल याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही.

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2020 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).